पनवेल : दुबईतील शारजाहमध्ये 10PL वर्ल्ड कप टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन करण्य़ात आले होते. या स्पर्धेमध्ये रायगड आणि पनवेलच्या संघांनीही सहभाग घेतला होता. भारतात इटली आणि दुबईवरून आलेल्या प्रवाशांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे उघड झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या खेळाडूंचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
सकाळी 6.30 च्या सुमारास पहिल्या विमानातून आलेल्या जवळपास 16 जणांना रायगडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. पनवेल महापालिकेने त्यांची ने-आण करण्यासाठी गाड्य़ांची व्यवस्था केली होती. या रुग्णालयामध्ये या सर्व खेळाडूंच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्यांना विलगिकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.
तर दुसऱ्या विमानाने आणखी 20 जण येणार असून त्यांना आणण्यासाठी पनवेल महापालिकेच्या गाड्या मुंबई विमानतळाकडे गेल्या आहेत. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात येणार आहेत. पुढील 14 दिवस देखरेखीसाठी या जवळपास 40 जणांना खारघरमधील ग्रामविकास भवनामध्ये ठेवण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
तळोज्यामध्ये काल कोरोनाचा रुग्ण सापडल्याने पनवेल, रायगडमध्ये खळबळ उडाली होती. यामुळे दुबईहून आलेल्या या खेळाडूंबाबत मोठी खबरदारी बाळगण्यात येणार आहे.
दुबईत कोणती स्पर्धा?
दुबईतील शारजाहमध्ये 10 पीएल वर्ल्ड कप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 8 ते 13 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. यासाठी हे खेळाडू गेले होते. वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ड्वेन ब्राव्हो हा या स्पर्धेचा सदिच्छादूत आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दोन मोसमात प्रत्येकी 16 संघ खेळले होते आणि यंदा 20 संघ खेळले आहेत.
Web Title: Coronavirus: Raigad, Panvel cricket players returned from Sharjah; Quarantine hrb
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.