जगभरात थैमान माजवणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सर्व जग एकजुटीनं लढा देत आहे. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज खेळाडू सोशल मीडियावरून लोकांना कोरोना व्हायरसबद्दल जनजागृती करत आहेत. कोरोना व्हायरसवर मात करता येते, त्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे, असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळानेही ( पीसीबी) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यातून त्यांनी कोरोना व्हायरस संदर्भात पाकिस्तानी जनतेसाठी संदेश पाठवला आहे. यात आफ्रिदीनं पाकिस्तानी जनतेला कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे, आवाहन केले आहे. पाकिस्तानात शुक्रवारी कोरोना व्हायरसमुळे चौथा बळी गेला. सिंधचे आरोग्य मंत्री डॉ आझरा फझल पेचूहो यांनी ही घोषणा केली.
पीसीबीनं लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी दिग्गज अष्टपैलू खेळाडू आफ्रिदीला लोकांना काही सूचना करण्यास सांगितल्या आहेत. या व्हिडीओत आफ्रिदीनं लोकांना हात धुण्याचे फायदे आणि सॅनिटायझरचा वापर, या संदर्भात माहिती दिली. कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानमधील सर्व महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
शाहिद आफ्रिदी काय म्हणाला?''आरोग्य हीच संपत्ती आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आपल्याला काही प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करावे लागेल. शिंकताना, खोकताना रुमालाचा किंवा टीशू पेपरचा वापर करण्याची गरज आहे. टीशू पेपरचा वापर झाल्यानंतर तो इतरत्र न फेकता कचऱ्याच्या डब्ब्यात टाकावा. जेवण्यापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ पाण्यानं नीट धुवावे. जर तुम्ही सुरक्षित, तर देश सुरक्षित,''असे आफ्रिदी म्हणाला.पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Corona Virus : ...अन् इंग्लंडचा खेळाडू बनला अन्नदाता; शाळकरी मुलांना पुरवतोय जेवण!
Corona Virusशी मुकाबला करण्यासाठी शेन वॉर्नचा मोठा निर्णय; तुम्हीही कराल कौतुक
Corona Virus : विरुष्काचं लोकांना महत्त्वपूर्ण आवाहन; पाहा व्हिडीओ
बोल्ड अँड ब्युटिफुल टेनिसस्टार असं काही बोलली की जगभरातील चाहते 'सुटलेच'!
No Gym नो फिकर... तंदुरुस्तीसाठी इंग्लंडच्या क्रिकेटपटूचा हटके व्यायाम, पाहा व्हिडीओ