मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरात लाखो मजूर अडकून पडले आहेत. जवळपास दोन महिन्यांपासून काम नसल्यानं उदरनिर्वाहाचा प्रश्न, घरी परतण्यासाठी पैसे नाहीत, अशा विवंचनेत सापडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचं काम सोनू सूद करत आहे. त्याच्या या मदतीचं सगळ्यांकडून कौतुक होत आहे. आतापर्यंत सोनूनं हजारो मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था केली आहे.चित्रपटांमध्ये खलनायक रंगवणारा सोनू सूद प्रत्यक्षात मात्र हजारो मजुरांसाठी हिरो ठरत आहे. अडचणीत सापडलेल्या मजुरांना सोनू मोलाची मदत करत आहे. त्याच्या या मदतीचं भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवननं तोंडभरून कौतुक केलं आहे. अडकलेल्या मजुरांनी त्यांच्या घरी पोहोचावं यासाठी एखाद्या नायकाप्रमाणे घेत असलेल्या प्रयत्नांना माझा सलाम, असं ट्विट धवन यानं केलं आहे. धवननं या ट्विटमध्ये सोनू सूदला टॅगदेखील केलं आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Coronavirus News: अडकलेल्या मजुरांसाठी 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदला गब्बरचा सलाम
Coronavirus News: अडकलेल्या मजुरांसाठी 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदला गब्बरचा सलाम
Coronavirus News: लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या हजारो मजुरांना घरी सोडण्याची व्यवस्था सोनूनं केली आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 8:35 PM