मेलबोर्न : आऊटडोअर सरावाला सुरुवात करणाऱ्या आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना इंग्लंडमध्ये होणाºया मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी तयार करण्यास सांगितले आहे. कारण आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धा या आठवड्यात स्थगित होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रसार माध्यमातील वृत्तानुसार या आठवड्यात टी-२० विश्वकप स्पर्धा अधिकृतपणे स्थगित करण्याचा निर्णय होईल.कोविड-१९ महामारीमुळे निर्माण झालेली समस्य बघता, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) बोर्ड १८ आॅक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत आॅस्ट्रेलियात होणाºया टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन स्थगित करण्याची शक्यता आहे. आॅस्ट्रेलियन वृत्तपत्र ‘डेली टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार क्रिकेट विश्वकप (टी-२०) स्पर्धा या आठवड्यात अधिकृतपणे स्थगित करण्यात येईल. या वृत्तात पुढे म्हटले आहे की, सप्टेंबर महिन्यावर लक्ष केंद्रित करीत सुरू असलेल्या सरावाचा विचार करता, अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखालील संघ जैविक सुरक्षित वातावरणात इंग्लंडचा दौरा करण्याचे संकेत मिळत आहेत. या दौºयाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण वेगवान गोलंदाज सप्टेंबरमध्ये पुनरागमन करण्याच्या दृष्टीने आपली कार्यक्षमता वाढविण्यावर भर देत आहेत.’ (वृत्तसंस्था)आयपीएलच्या आयोजनासाठी आता न्यूझीलंडचा प्रस्तावकोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे जर इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन भारतात शक्य झाले नाही तर संयुक्त अरब अमिरात व श्रीलंका यांच्यानंतर न्यूझीलंडने आयपीएलच्या आयोजनाचा प्रस्ताव दिला आहे.आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आॅस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वकप स्पर्धा स्थगित होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आयपीएलसाठी विंडो निर्माण होऊ शकते. बीसीसीआय यापूर्वीच सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत आयपीएल आयोजनाच्या शक्यतेवर विचार करीत आहे. बोर्डाचा पहिला पर्याय भारतात आयोजन करण्याचा राहील, पण कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता हे अशक्य भासते. अमेरिका व ब्राझील यानंतर सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत.वोर्डच्या एका सीनिअर अधिका-याने सांगितले, ‘भारतात आयपीएलचे आयोजन करण्यास प्राधान्य राहील, पण येथे शक्य झाले नाही तर दुसरे पर्याय शोधावे लागतील. संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांनी यजमानपदाचा प्रस्ताव दिलेला आहे. आम्ही सर्वांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ. खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्याबाबत कुठला समझोता होणार नाही.’२००९ मध्ये भारतातील सार्वत्रिक निवडणुकीमुळे आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये याच कारणामुळे काही सामने यूएईमध्ये खेळल्या गेले होते. पण २०१९ मध्ये निवडणुकीनंतरही आयपीएलचे आयोजन भारतातच झाले. जर आयपीएलचे आयोजन विदेशात झाले तर यजमानपदाच्या शर्यतीत अमिरात सर्वांत आघाडीवर आहे.न्यूझीलंड कोरोनामुक्त झाला असला तरी भारत आणि तेथील स्थानिक वेळेमध्ये साडेसात तासांचा फरक आहे. सामना जर दुपारी १२.३० वाजता सुरू झाला तर कार्यालयात जाणारे किंवा घरून काम करणाऱ्यांनाही तो बघता येणार नाही.हॅमिल्टनहून आॅकलंड व्यतिरिक्त वेलिंग्टन, ख्राईस्टचर्च, नेपियर किंवा डुनेडिन येथे जाणे विमान प्रवासाशिवाय शक्य नाही. अधिकाºयाने सांगितले की, आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीची तारीख लवकरच कळविण्यात येईल. त्यात या सर्व बाबींसह चिनी प्रायोजन करारावर चर्चा होईल. बोर्डाने चिनी मोबाईल निर्माता कंपनी विवोसोबत पाच वर्षांसाठी आयपीएल टायटल प्रायोजन करार केला आहे. त्यातून २०२२ पर्यंत वार्षिक ४४० कोटी रुपये मिळणार आहेत. चिनी गुंतवणूक असलेली भारतीय कंपनी पेटीएमसुद्धा आयपीएलसोबतजुळलेली आहे.
आता इंग्लंड-आॅस्ट्रेलिया मालिकेची तयारीआॅस्ट्रेलियन खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. जर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली तर ते खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर थेट आयपीएलचे आयोजन जेथे होईल तेथे दाखल होतील. आॅस्ट्रेलियन संघ आता इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या वन-डे व टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेची तयारी करीत आहे.’