नवी दिल्ली : ‘क्रिकेट पुन्हा सुरू करायचे झाल्यास भारतीय संघाला आॅस्ट्रेलिया दौऱ्यात दोन आठवडे क्वारंटाईन होण्याची तयारी ठेवावी लागेल. अन्य कुठला पर्याय नाही. दोन आठवडे मोठा काळ नाही. आॅस्ट्रेलिया दौरा वाचविण्यासाठी आम्ही भारतीय संघाला दोन आठवडे क्वारंटाईन होण्यास मंजुरी प्रदान केली आहे.’ बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
यंदा आॅस्ट्रेलियात आॅक्टोबरमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषकाचे आयोजन होईल, असे वाटत नाही, असे वक्तव्यदेखील धुमल यांनी केले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला यावर्षाअखेर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आॅस्ट्रेलिया दौºयावर जायचे आहे. मालिका खेळण्याआधी भारतीय खेळाडूंना दोन आठवड्यांसाठी विलगीकरणात राहावे लागणार आहे. आॅस्ट्रेलियातील हका वृत्तपत्रासोबत संवाद साधताना धुमल म्हणाले, ‘हा दौरा वाचविण्यासाठी भारताचा संघ क्वारंटाईन होण्यास तयार आहे. अन्य कुठला पर्याय नाही. भारताला क्वारंटाईन व्हावेच लागेल. क्रिकेट सुरू करण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. दोन आठवडे लॉकडाऊन फार मोठे नाही.’
आयसीसी कसोटी क्रमवारीत आॅस्ट्रेलियाने भारताला मागे टाकून अव्वल स्थान पटकवले आहे. भारत क्रमवारीत तिसºया स्थानावर घसरला. कोरोनामुळे आर्थिक डबघाईस आलेल्या क्रिकेट आॅस्ट्रेलियाला या दौºयामुळे लाखो डॉलरची कमाई होणार आहे. आॅस्ट्रेलियासाठी हा दौरा किती महत्त्वाचा आहे याचा अंदाज यावरून येतो की सीएने दौºयात पाचवा कसोटी सामना खेळण्याचादेखील आग्रह धरला. भारताने त्यांच्यासोबत एक कसोटी अधिक खेळणे याचा अर्थ आॅस्ट्रेलियाने नोव्हेंबरमधील अफगाणिस्तानविरुद्ध होणारा कसोटी सामना सोडून देणे असा होईल.
यावर धुमल म्हणाले, ‘मालिकेत एक सामना वाढविण्यावर भाष्य करणे अतिघाईचे ठरेल. यापेक्षा मर्यादित षटकांचे सामने अधिक खेळणे हितावह ठरेल़ यातून अधिक उत्पन्न येईल. सीएला आर्थिक लाभ हवा आहे आणि आर्थिक लाभ कसोटीच्या तुलनेत वन डे तसेच टी-२० तून अधिक मिळतो. भारतीय संघाला द्विपक्षीय मालिकेसाठी प्रवास नियमात सवलत देणे आॅस्ट्रेलियासाठी हितावह ठरणार आहे.’ (वृत्तसंस्था)
आयपीएल रद्द झाल्यास ४ हजार कोटींचे नुकसान
आयपीएलचे आयोजन यंदा रद्द झाल्यास बीसीसीआयला चार हजार कोटींचे नुकसान होर्ईल, अशी माहिती अरुण धुमल यांनी दिली. स्थानिक सत्राचे आयोजनदेखील पूर्ण होऊ शकले नाही तर आमच्यासाठी आयपीएलमधून होणारे नुकसान मोठे असेल. आमच्यावर मोठे संकट ओढवेल, असे धूमल यांनी सांगितले.
टी-२० विश्वचषक आयोजनात अडथळे
१६ देशांचा समावेश असलेल्या टी-२० विश्वचषकाचे आयोजन करणे हा वेगळा मुद्दा असल्याचे सांगून धुमल म्हणाले, ‘कोरोनामुळे क्रिकेट ठप्प आहे. सराव बंद आहे, अशातच आॅक्टोबरमध्ये आयोजित या मोठ्या स्पर्धेसाठी सज्ज होतील का, हा प्रश्न आहे. कोरोनानंतर खेळाडूंच्या आरोग्याची हमी घेण्यासाठी सीएला तारेवरची कसरत करावी लागू शकते. दुसरीकडे सराव न करता थेट विश्वचषकात उतरण्याचा कठीण निर्णय प्रत्येक बोर्डाला घ्यावा लागणार आहे.’
सीएला हवी बीसीसीआयची साथ
कोरोनाच्या संकटात बीसीसीआयने पुढाकार घेत क्रिकेट आॅस्ट्रेलियासह अन्य देशांच्या क्रिकेट बोर्डांना मदत करावी. यातून केवळ उत्पन्न नव्हे तर अन्य गोष्टींचा मार्ग मोकळा होइल, असे आयसीसीला वाटते. कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भारताचा दौरा अतिशय उपयुक्त असल्याचे आॅस्ट्रेलियाचे मत आहे. आयसीसी सदस्य असलेल्या प्रत्येक बोर्डाच्या संघासोबत भारत आणि इंग्लंड संघांनी मालिका खेळाव्यात. यातून मोठा नफा संबंधित बोर्डांना मिळू शकतो.
Web Title: Coronavirus: Team India ready to be quarantined; The chances of hosting the T20 World Cup this year are slim
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.