मेलबोर्न : क्रिकेट आॅस्ट्रेलियाने चॅनल सेव्हनसोबत अनेक अब्ज रुपयांचा प्रसारण हक्काचा करार वाचविण्यासाठी भारतीय संघाचा दौरा आणि बिग बॅश लीग टी-२० स्पर्धेसाठी बायो-बबल (जैव सुरक्षित) तयार करण्यासाठी योजना आखली आहे याचा प्रस्तावित खर्च ३० मिलियन आॅस्ट्रेलियन डॉलर (जवळजवळ १.६० अब्ज रुपये) आहे.भारताला वर्षाअखेर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आॅस्ट्रेलिया दौरा करायचा आहे. सिडनी मॉर्निंग हेरॉल्डच्या वृत्तानुसार ‘सीएने सेव्हन वेस्ट मीडियासोबतचे नाते कायम राखण्यासाठी व प्रसारण हक्क वाचविण्याच्या उद्देशाने आगामी स्पर्धेसाठी ३० मिलियन आॅस्ट्रेलियन डॉलरपेक्षा अधिक रकमेचे बजेट ठेवले आहे. आर्थिक अडचणींना सामोरे जात असलेल्या आॅस्ट्रेलिया बोर्डाचे कोरोनामुळे नुकसान झाल्याने भारतीय संघाचा दौरा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- बायो-बबलचा खर्च दीड अब्जापेक्षा अधिक
बायो-बबलचा खर्च दीड अब्जापेक्षा अधिक
भारताला वर्षाअखेर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आॅस्ट्रेलिया दौरा करायचा आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 5:10 AM