Join us  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर धोनी देशवासियांना वाटतो हिरो, जाणून घ्या सर्व्हे...

मोदी यांच्यानंतर भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा या सर्व्हेमध्ये दुसरा क्रमांक लागत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 9:25 PM

Open in App

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सध्याच्या घडीला जगभरातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जेव्हा सर्वात प्रशंसित भारतीय व्यक्ती देशवासियांनी निवडली तेव्हा त्यामध्ये पहिला क्रमांक हा मोदी यांचा होता. पण मोदी यांच्यानंतर भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा या सर्व्हेमध्ये दुसरा क्रमांक लागत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

एका कंपनीने जगभरामध्ये एक सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये 42 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये सर्वात प्रशंसित व्यक्ती तुम्हाला कोण वाटते, असे प्रश्न विचारण्यात आला. या सर्व्हेमध्ये भारतीय पुरुषांमध्ये अव्वल स्थान पटकावले ते नरेंद्र मोदी यांनी. या सर्व्हेमध्ये 15.66 टक्के लोकांनी मोदी यांना मत दिले. मोदी यांच्यानंतर दुसरा क्रमांक लागला आहे तो धोनीचा. धोनीला या सर्व्हेमध्ये 8.58 टक्के लोकांनी मत दिले आहे. पुरुष खेळाडूंमध्ये धोनी हा पहिल्या स्थानावर आहे. धोनीनंतर माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा क्रमांक लागतो. कारण सचिनला या या सर्व्हेमध्ये 5.81 टक्के मते मिळाली आहेत. सचिननंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीचा क्रमांक येतो. कारण या सर्व्हेमध्ये कोहलीला 4.46 टक्के लोकांनी मते दिली आहेत. कोहलीपेक्षाही कमी टक्के मते फुबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला मिळाले आहेत. या सर्व्हेमध्ये रोनाल्डोला 2.95 टक्के मते मिळाली आहेत. पण जर महिला क्रीडापटूंचा विचार केला तर यामध्ये बॉक्सिंग क्वीन मेरी कॉमला सर्व क्रीडापटूंपेक्षा जास्त टक्के मते मिळाली आहेत. कारण मेरीला या सर्व्हेमध्ये 10.36 टक्के मते मिळाली आहेत. मेरीनंतर महिलांमध्ये किरण बेदी, लता मंगेशकर, सुष्मा स्वराज, दीपिका पदुकोण यांचा क्रमांक येतो.

टॅग्स :नरेंद्र मोदीमहेंद्रसिंग धोनी