ठळक मुद्देया जोडप्यातील पतीने 2015 साली झालेल्या विश्वचषकात नेत्रदीपक कामगिरी केली होती.पत्नीने रविवारी झालेल्या विश्वविजयात सिंहाचा वाटा उचलला होता. आता तुम्हा समजले असेल की, हे जोडपे ऑस्ट्रेलियाचे आहे.
नव दिल्ली : ते दोघे क्रिकेटपटू आहेत. या जोडप्याने फक्त देशाचे प्रतिनिधीत्व केले नाही, तर दोघांनीही आपल्या देशाला विश्वचषक जिंकवून दिला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, हे दोघे आहेत तरी कोण? या जोडप्यातील पतीने 2015 साली झालेल्या विश्वचषकात नेत्रदीपक कामगिरी केली होती. या विश्वविजयात त्याचा मोलाचा वाटा होती. पत्नीने रविवारी झालेल्या विश्वविजयात सिंहाचा वाटा उचलला होता. आता तुम्हा समजले असेल की, हे जोडपे ऑस्ट्रेलियाचे आहे. या जोडप्यातील पती म्हणजे वेगवान गोलंदज मिचेल स्टार्क आणि पत्नी आहे एलिसा हिली.
रविवारी पहाटे वेस्ट इंडिजमध्ये महिला ट्वेन्टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी पार पडली. या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा सहज पराभव केला. या विश्वविजयात ऑस्ट्रेलियासाठी महत्वाचा वाटा उचलला तो हिलीने. या विश्वचषकात तिने पाच सामन्यांमध्ये 56.23 च्या सरासरीने 225 धावा केल्या. त्याचबरोबर यष्टीरक्षणाची जबाबदारीही एलिसाकडेही होती.
स्टार्क हा 2015च्या विश्वचषकाचा नायक होता. या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार स्टार्कने पटकावला होता. 2015च्या विश्वचषकात स्टार्कने 22 बळी मिळवले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तर स्टार्कने सहा बळी पटकावले होते. स्टार्कने भारताविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात संघात दोन वर्षांनी पुनरागमन केले होते.
एलिसा आणि मिचेल यांच्यामध्ये सहा वर्षांपासून अफेअर होते. त्यानंतर या दोघांनी 15 एप्रिल 2016 साली लग्न केले. सिडनीच्या मैदानात या दोघांची ओळख झाली होती.
Web Title: The couple won world cup for country, know about this couple ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.