कोरोना व्हायरसमुळे २०२०मध्ये भारतातील अनेक स्पर्धा रद्द झाल्या. इंडियन प्रीमिअर लीगचा ( IPL 2020) १३वा हंगाम संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्यात आली. मुंबई इंडियन्सनं पाचव्यांदा आयपीएल जेतेपदाचा चषक उंचावला. देशातील कोरोना परिस्थिती सुधरत असली तरी अजूनही क्रीडा स्पर्धांना नियमांचं पालक करूनच मान्यता दिली जात आहे. २०२०तर देशात स्थानिक क्रिकेट स्पर्धा झाल्याच नाही आणि त्याचा सर्वाधिक फटका खेळाडूंना बसला. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 ट्रॉफी स्पर्धेला १० जानेवारीपासून सुरूवात झाली आणि तामिळनाडू व बडोदा असा अंतिम सामना होणार आहे. अन्य स्थानिक स्पर्धांच्या दृष्टीनं BCCIनं काही मोठे निर्णय घेतले आहेत आणि त्यातील एका निर्णयानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कांगारूचा केक का कापला नाही?; अजिंक्य रहाणेचं उत्तर ऐकून त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढला
भारतीय क्रिकेटचा कणा समजली जाणारी रणजी करंडक ( Ranji Trophy) स्पर्धा यंदा न खेळवण्याचा निर्णय BCCIनं घेतला आहे. ८७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच रणजी करंडक स्पर्धा खेळवण्यात येणार नाही. त्याजागी विजय हजारे चषक स्पर्धा खेळवण्याचे ठरवले आहे आणि राज्य संघटनांनी तशी मागणी केली होती. BCCI विनू मंकड चषक १९ वर्षांखालील वन डे क्रिकेट स्पर्धा आणि महिलांची वन डे राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार आहे. तसे पत्र सचिव जय शाह यांच्या स्वाक्षरीसह सर्व राज्य संघटनांना पाठवण्यात आले आहे. टीम इंडियाला ICC Test Ranking मध्ये पुन्हा अव्वल स्थान पटकावण्याची संधी, पण...
दोन महिन्यांच्या बायो बबलमुळे रणजी करंडक स्पर्धा खेळवणे सद्यस्थितीत अवघड आहे. त्यामुळे मर्यादित षटकांचे अधिक सामने खेळवण्याचा BCCIचा प्रयत्न आहे. या स्पर्धांमधून प्रत्येक खेळाडूला प्रती सामना किमान १.५ लाख रुपये मिळतात. ''विजय हजारे ट्रॉफीसह वरिष्ठ महिला वन डे स्पर्धेचं आयोजन करणार असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. याशिवाय १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. २०२०-२१च्या हंगामात या स्थानिक स्पर्धा खेळवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,''असे शाह यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत बायो बबल नियमांच्या पालन करण्यासाठी संघांचे सामने काही ठराविक स्टेडियमवरच खेळवण्यात येतील. मुंबई इंडियन्सच्या माजी फलंदाजाची तुफान फटकेबाजी; ९ चेंडूंत कुटल्या ५० धावा!
रणजी करंडकाचा इतिहास१९३४साली पहिल्यांदा रणजी करंडक खेळवण्यात आला. देशाचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सर रणजीतसिंहजी विभाजी जडेजा यांच्या नावावरून ही स्पर्धा खेळवण्यात येते. मुंबईने सर्वाधिक ४१ वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. Fact Check : किरॉन पोलार्डच्या गाडीचा भीषण अपघात; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या निधनाची चर्चा