यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) संयुक्त अरब अमिराती येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाले आहेत. भारतीय खेळाडू आयपीएलसाठी यूएईत पोहोचले असले तरी त्यांना प्ररदेशी खेळाडूंची प्रतीक्षा पाहावी लागणार आहे.
IPL 2020 पूर्वी कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूची CPL मध्ये तुफान फटकेबाजी!
आयपीएल संघांतील काही खेळाडू सध्या कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये (सीपीएल) खेळत आहेत. त्यातील सनरायझर्स हैदराबाद संघाचा फिरकीपटू रशीद खाननं गुरुवारी ट्वेंटी-20 क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.अफगाणिस्तानचा हा फिरकीपटू सीपीएलमध्ये बार्बाडोस ट्रायडंट्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. गुरुवारी सेंट ल्युसीआ झौक्स यांच्याविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला. पावसाच्या व्यत्ययामुळे झौक्ससमोर 4 षटकांत 47 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते आणि त्यांनी 7 विकेट्स राखून हा सामना जिंकला.
रोहित शर्मा पत्नी अन् मुलीसह झाला यूएईसाठी रवाना; RCB, DC, CSKनंही घेतली भरारी
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ट्रायडंट्सनं 7 बाद 131 धावा केल्या, परंतु 18.1 षटकानंतर पावसाची सुरुवात झाली. त्यामुळे झौक्ससमोर 47 धावांचे लक्ष्य ठेवले. 4.1 षटकांत त्यांनी 50 धावा करून बाजी मारली. रखीम कोर्नवॉल (14), आंद्रे फ्लेचर (16) आणि मोहम्मद नबी ( 15) यांनी हा सामना जिंकून दिला. रशीदनं या सामन्यात दोन विकेट्स घेतल्या. त्याची ही कामगिरी विश्वविक्रमी ठरली.
त्यानं नबीला बाद करून विक्रमाची नोंद केली. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 300 विकेट्स घेणारा तो सर्वात युवा गोलंदाज ठरला. त्यानं 21 वर्ष व 335 दिवसांनी हा विक्रम केला. शिवाय 213 सामन्यांत ही कामगिरी करून 300 विकेट्स घेणारा जलद गोलंदाज ठरला. आयपीएलमध्ये रशीद सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करतो.
Video: खतरनाक अपघात; बाईक्सचे झाले तुकडे तुकडे; रेसिंग सुरू असताना रायडरचा तोल गेला अन्...
IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीची 'मसल्स' पॉवर; आयपीएलमधील अशक्यप्राय विक्रम नावावर!