इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या मोसमाला सुरूवात होण्यापूर्वी आजपासून कॅरेबियन प्रीमिअर लीग ( सीपीएल) सुरू झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे नाणेफेकीला उशीर झाला. सामन्यांच्या षटकांची संख्याही कमी करून 17-17 इतकी करण्यात आली आहे. त्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार किरॉन पोलार्डनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गयाना अॅमेझॉन वॉरियर्सच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. न्यूझीलंडच्या रॉस टेलरनं 157.14च्या स्ट्राईकरेटनं धावा कुटल्या. शेमरॉन हेटमायर आणि निकोलस पूरण यांनी वॉरियर्सचा डाव सावरताना समाधानकारक पल्ला गाठून दिला.
ब्रेंडन किंग ( 0) आणि चंद्रपॉल हेमराज ( 3) हे सलामीवीर झटपट माघारी परतल्यानंतर हेटमारयनं एक बाजून लावून धरली. त्यानं 38 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. रॉस टेलरनं 21 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकार खेचून 33 धावा केल्या, तर पूरणनं 16 चेंडूंत 18 धावा केल्या. रायडर्सच्या सुनील नरीननं 4 षटकांत 19 धावांत 2 विकेट्स घेतल्या.