Join us  

CPL 2020 : नाइट रायडर्स संघातला 48 वर्षांचा तरुण; जाँटी ऱ्होड्स स्टाईल घेतली कॅच, पाहा व्हिडीओ

CPL 2020: प्रविण तांबेनं एक अफलातून कॅच घेऊन  सर्वांचे लक्ष वेधले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 4:57 PM

Open in App

खेळाडूला वयाचं बंधन नसतं... हे वाक्य 48 वर्षीय प्रविण तांबेसाठी तंतोतंत फिट बसले. कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) खेळणारा प्रविण तांबे हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे. सीपीएलमध्ये तो त्रिनबागो नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. बुधवारी नाइट रायडर्सनं सलग आठव्या विजयाची नोंद करताना सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स संघावर 59 धावांनी विजय मिळवला. पण, या सामन्यात प्रविण तांबेनं एक अफलातून कॅच घेऊन  सर्वांचे लक्ष वेधले. 

पॅट्रीओट्सचा सलामीवीर एव्हीन लुईसला खॅरी पिएरेनं बाद केलं. दुसऱ्याच षटकात लुईसनं टोलावलेला चेंडू प्रविण तांबेनं अफलातून झेल घेतलं. त्याचा हा झेल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  नाइट रायडर्सचा सलग आठवा विजयकॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) बुधवारी त्रिनबागो नाइट रायडर्सचा फलंदाज लेंडल सिमन्सनं तुफान फटकेबाजी केली. सिमन्स आणि आमीर जंगू हे रायडर्ससाठी सलामीला आले. पण, जंगू ( 6) धावबाद झाला. त्यानंतर कॉलीन मुन्रो ( 9) रिटायर्ड हर्ट झाला. डॅरेन ब्राव्हो आणि सिमन्स यांनी रायडर्ससाठी खिंड लढवली. ब्राव्हो 2 षटकार व 2 चौकारांसह 36 धावा करून माघारी परतला. सिमन्सनं 63 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकारांसह 96 धावा केल्या. अखेरच्या षटकात डॉमिनिक ड्रॅक्सनं त्याला बाद केलं. रायडर्सनं 4 बाद 174 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पॅट्रीओट्सनं 7 बाद 115 धावा केल्या. 

संजय राऊतांनी शिवसेनेचं खरं रूप दाखवलं; कंगना Vs. सेना सामन्यात बबिता फोगाटची उडी 

IPL 2020 : CSKच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून सुरेश रैनाची हकालपट्टी; महेंद्रसिंग धोनीच्या हाती अंतिम निर्णय 

IPL 2020 : आयपीएलमधील कोरोना सदस्यांचा आकडा 14 झाला, आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

 

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट