Join us  

CPL 2020 : मोहम्मद नबीच्या विक्रमी खेळीला स्कॉट अन् रोस्टनची साजेशी साथ

CPL 2020 :  St Lucia Zouks won by 10 runs against St Kitts and Nevis Patriots 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 11:20 PM

Open in App

कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2020) आजच्या सामन्यात सेंट ल्युसीआ झौक्स संघानं प्रथम फलंदाजी करताना सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स संघाविरुद्ध 20 षटकांत 6 बाद 172 धावा चोपल्या. आंद्रे फ्लेचर,  मार्क डेयाल, नजीबुल्लाह झाद्रान आणि मोहम्मद नबी यांनी पॅट्रीओट्स संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. गोलंदाजीतही झौक्सच्या खेळाडूंनी कमाल दाखवली

फ्लेचर आणि रहकिम कोर्नवॉल यांनी पहिल्या विकेटसाठी 73 धावा चोपताना झौक्स संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानं डेयाल आणि झाद्रान यांनी फ्लेचरला तोडीसतोड साथ दिली. फ्लेचरनं 33 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून 46 धावा केल्या. डेयालनं 17 चेंडूंत 3 उत्तुंग षटकार खेचून 30 धावा, तर झाद्राननं 24 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचून 28 धावा केल्या. सोहेल तन्वीर आणि जॉन-रस जॅग्गेसर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन झौक्सच्या धावगतीला ब्रेक लावला. पण, नबीनं 22 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 35 धावांची खेळी केली.  या खेळीसह त्यानं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा पल्लाही पार केला. लक्षाचा पाठलाग करताना ख्रिस लीन आणि एव्हीन लुईस यांना साजेशी सुरुवात करता आली नाही. नबीनं पॅट्रीओट्सचा सलामीवीर लीनला बाद केलं.  त्यानंतर रोस्टन चेसनं पॅट्रीओट्स संघाला तीन धक्के दिले. जोशूा डा सिल्वा ( 1), लुईस ( 29) आणि बेन डंक ( 5) यांना त्यानं माघारी पाठवले. चेसनं 4 षटकांत 12 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. दिनेश रामदिननं 35 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकार खेचून 46 धावांची खेळी करताना पॅट्रीओट्सच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. पण, स्कॉट कुगेलेजीननं त्याला बाद केलं. स्कॉटनं 4 षटकांत 33 धावा देताना 4 विकेट्स घेतल्या. पॅट्रीओट्सना 8 बाद 162 धावांवर समाधान मानावं लागलं, झौक्सनं हा सामना 10 धावांनी जिंकला.  

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट