कॅरेबियन प्रीमिअर लीगला ( CPL 2020) आजपासून सुरूवात होणार आहे. या लीगमध्ये 33 सामने खेळवण्यात येणार आहेत. टॉरूबा येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत 23 आणि पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर 10 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होणार आहे. 10 सप्टेंबरला लीगचा अंतिम सामना होईल. बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानच्या त्रिनबागो नाइट रायडर्स आणि गयाना अॅमेझॉन वॉरियर्स यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.
BREAKING: टाटा सन्स, बायजूला मागे सारून 'ड्रीम 11' झाले IPL 2020 चे स्पॉन्सर, मोजले 222 कोटी
Rajiv Gandhi Khel Ratna award : रोहित शर्मा, विनेश फोगाट यांच्यासह चौघांना मिळणार पुरस्कार
पुरस्कार ते तिरस्कार; क्रिकेटवीरांना 'अपमानाचा नारळ' द्यायचं BCCI चं धोरण बरं नव्हं!
हार्दिक पांड्याने जाहीर केलं मुलाचं नाव; बघा या फोटोत तुम्हाला सापडतंय का?
रायडर्स संघाचे नेतृत्व किरॉन पोलार्डकडे असणार आहे. ड्वेन ब्राव्होच्या नेतृत्वाखाली नाइट रायडर्सनं 2017 आणि 2018चे सीपीएल जेतेपद पटकावले होते. पण, ब्राव्होनं यंदा कर्णधारपद नको, असे मालकांना सांगितल्यानं ती जबाबदारी पोलार्डकडे सोपवण्यात आली आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ब्रोव्हो चेन्नई सुपर किंग्सकडून, तर पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून खेळतो.
- नाइट रायडर्स - ड्वेन ब्राव्हो, किरॉन पोलार्ड, सुनील नरीन, कॉलीन मुन्रो, फवाद अहमद, डॅरेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स, खॅरी पिएरे, टीम सेईफर्ट, सिकंदर रजा, अँडरसन फिलीप, प्रविण तांबे, जयडेन सील्स, आमीर जँगू, टिऑन, वेबस्टर, एकील होसेन, मुहम्मद अली खान
- वॉरियर्स - इम्रान ताहीर, निकोलस पूरन, ब्रँडन किंग, रॉस टेलर, शिमरोन हेटमायर, ख्रिस ग्रीन, किमो पॉल, शेर्फान रुथरफोर्ड, नवीन उल हक, चंद्रपॉल हेमराज, केव्हीन सिंक्लेअर, अशमेद नेड, ओडीन स्मिथ, अँथोनी ब्रॅम्बेले, जसदीप सिंह, किसूंदथ मॅग्राम.
- सामन्याची वेळ - सायंकाळी 7.30 वाजल्यापासून
- थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स
- अॅप- फॅन कोड
ट्वेंटी-20 लीग सुरू होण्यापूर्वी झाला राडा; शाहरुख खानच्या संघाला विशेष 'सूट'? अन्य फ्रँचायझी नाराज