ट्वेंटी-20 लीग सुरू होण्यापूर्वी झाला राडा; शाहरुख खानच्या संघाला विशेष 'सूट'? अन्य फ्रँचायझी नाराज

कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यासाठी खेळाडूंना नियम पाळावे लागत आहेत, परंतु...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 01:58 PM2020-08-13T13:58:12+5:302020-08-13T14:02:26+5:30

whatsapp join usJoin us
CPL 2020: Teams unhappy with Trinbago Knight Riders staying outside the bubble and training | ट्वेंटी-20 लीग सुरू होण्यापूर्वी झाला राडा; शाहरुख खानच्या संघाला विशेष 'सूट'? अन्य फ्रँचायझी नाराज

ट्वेंटी-20 लीग सुरू होण्यापूर्वी झाला राडा; शाहरुख खानच्या संघाला विशेष 'सूट'? अन्य फ्रँचायझी नाराज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे आयपीएलचा थरार रंगणार आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार यूएईला रवाना होण्यापूर्वी खेळाडूंची दोन वेळा कोरोना चाचणी केली जाईल आणि दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना भारताबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. आयपीएल सुरू होण्यास अजून महिना शिल्लक आहे आणि पुढील आठवड्यात सर्व संघ युएईत दाखल होतील. 

शाहरूख खानच्या संघाचे नेतृत्व किरॉन पोलार्ड करणार; ड्वेन ब्राव्होही एकाच संघाकडून खेळणार

आयपीएलपूर्वी क्रिकेटप्रेमींना आणखी एका ट्वेंटी-20 लीगचा थरार अनुभवता येणार आहे. पण, पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या या लीगपूर्वी राडा सुरू झाला आहे. याही लीगमध्ये खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन जैव सुरक्षितता बबल तयार केला गेला आहे. पण, त्यावरून आता नवा राडा सुरू झाला आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीसह अन्य फ्रँचायझींनी नाराजी व्यक्त केली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानंही सीपीएलमध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्यानं त्रिनबागो नाइट रायडर्सचे मालकी हक्क खरेदी केले आहेत. या संघातील खेळाडू नियमांचं उल्लंघन करून मैदानावर सराव करताना दिसल्यानं, सॅमी नाराज आहे.  

कॅरेबियन लीगचा थरार पुढील आठवड्यापासून सुरू होणार; लीगचं वेळापत्रक एका क्लिकवर!

कॅरेबियन प्रीमिअर लीगला ( CPL 2020) पुढील आठवड्यापासून सुरूवात होणार आहे. जगभरातील सर्व ट्वेंटी-20 लीगमध्ये कॅरेबियन लीगचीही प्रचंड चर्चा आहे. 18 ऑगस्टपासून या लीगला सुरू होणार असून 33 सामने खेळवण्यात येणार आहेत. टॉरूबा येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत 23 आणि पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर 10 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होणार आहे. 10 सप्टेंबरला लीगचा अंतिम सामना होईल.  

ट्वेंटी-20 लीगसाठी 162 खेळाडू अन् अधिकाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला समोर; सर्व झाले क्वारंटाईन

सेंट ल्युसीया झौक्स संघाचा कर्णधार डॅरेन सॅमीनं सर्वांना एकच नियम, असा दावा करून वादाला तोंड फोडले. त्यानं ट्विट केलं की,''लीगमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना जैव सुरक्षितता बबलमध्ये रहावे लागत आहे. तरीही एका विशेष संघातील खेळाडू मैदानावर सरावासाठी उतरले आहेत. त्यांना परवानगी देण्यात आली आहे का?''


 तो पुढे म्हणाला,''पहिल्या दिवसापासून प्रत्येक जण बबलमध्येच आहोत. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी हे महत्त्वाचे आहे. मी कोरोना तज्ज्ञ नाही.''  
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

खरंच, 2021चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारतात होणार? ICCनं तयार ठेवलाय बॅकअप प्लान! 

IPL 2020 : मोठी बातमी; टीम इंडियाच्या त्रिशतकवीर फलंदाजाला झाला होता कोरोना

England vs Pakistan : फॅनसोबतच्या एका फोटोमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर संकट?  

विराट कोहलीचा फोटो असलेल्या जाहिरातीवर BCCIची कारवाई; जाणून घ्या नेमकं कारण 

Video: वेटलिफ्टरनं उचललं 400 किलो वजन, अन्...; मन घट्ट करून पाहा थरार 

 

Web Title: CPL 2020: Teams unhappy with Trinbago Knight Riders staying outside the bubble and training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.