CPL 2021 : KKRसाठी आनंदाची बातमी, आंद्रे रसेलची वर्ल्ड रिकॉर्ड खेळी; RCBच्या नव्या भीडूचीही पदार्पणातच दमदार फटकेबाजी!

Caribbean Premier League 2021 : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2021) शुक्रवारी धमाकेदार आतषबाजी पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 11:40 PM2021-08-27T23:40:26+5:302021-08-27T23:40:49+5:30

whatsapp join usJoin us
CPL 2021 : Andre Russell smashes record-breaking fifty in just 14 balls, RCB signing Tim David scored 56 in just 28 balls | CPL 2021 : KKRसाठी आनंदाची बातमी, आंद्रे रसेलची वर्ल्ड रिकॉर्ड खेळी; RCBच्या नव्या भीडूचीही पदार्पणातच दमदार फटकेबाजी!

CPL 2021 : KKRसाठी आनंदाची बातमी, आंद्रे रसेलची वर्ल्ड रिकॉर्ड खेळी; RCBच्या नव्या भीडूचीही पदार्पणातच दमदार फटकेबाजी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Caribbean Premier League 2021 : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2021) शुक्रवारी धमाकेदार आतषबाजी पाहायला मिळाली. जमैका तल्लावाह्स ( Jamaica Tallawahs) आणि सेंट ल्युसी किंग्स ( St Lucia Kings) यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ३९० धावा चोपल्या. त्यापैकी जमैकानं ५ बाद २५५ धावा कुटून रिकॉर्ड नोंदवला अन् त्या रिकॉर्डमध्ये आंद्रे रसेलचा ( Andre Russell) खूप मोठा वाटा होता. रसेलनं ३७५च्या स्ट्राईक रेटनं तुफान फटकेबाजी केली. CPLमध्ये पदार्पण करणाऱ्या अन् आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बँगळुरूकडून ( RCB) खेळणाऱ्या टीम डेव्हीड यानंही त्याच्या आक्रमकतेची झलक दाखवली. जमैकानं हा सामना १२० धावांनी जिंकला.

Video : लॉर्ड्सवर फिल्डींग अन् लिड्सवर फलंदाजी; टीम इंडियाच्या 'इंग्लिश' फॅननं घातला गोंधळ

प्रथम फलंदाजीला आलेल्या जमैकाच्या सलामीच्या जोडीपासून ते पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजापर्यंत सर्वांना किंग्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. चॅडविक वॉल्टन व केन्नार लेवीस यांनी पहिल्या ६ षटकांत ८१ धावा कुटल्या. लेवीस २१ चेंडूंत २ चौकार व ५ षटकार खेचून ४८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या हैदर अलीनं दाणपट्टा चालवला. वॉल्टन २९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ४७ धावांवर बाद झाला. हैदरनं ३२ चेंडूंत ४५ ( ४ चौकार व २ षटकार) धावा केल्या. कर्णधार रोव्हमन पॉवेलनं ३८ धावांचे योगदान दिले. पण, आंद्रे रसेलनं १४ चेंडूत ५० धावा कुटल्या. त्यानं ३ चौकार व ६ षटकार खेचून अवघ्या ९ चेंडूंत ४८ धावा केल्या. जमैकानं ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला. 

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या किंग्सकडून टीम डेव्हीड व वाहब रियाझ यांनी संघर्ष केला. सिंगापूरचा फलंदाज डेव्हीड यंदा प्रथमच आयपीएलमध्येही खेळणार आहे. त्याला विराट कोहलीच्या RCBनं करारबद्ध केले आहे. डेव्हीडनं २८ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावा केल्या, तर रियाझनं २६ धावांचे योगदान दिले. किंग्सचा संपूर्ण संघ १७.३ षटकांत १३५ धावांवर गडगडला. मिगेल प्रेटोरियसनं सर्वाधिक ४, तर इम्रान खाननं तीन विकेट्स घेतल्या. 

 

Web Title: CPL 2021 : Andre Russell smashes record-breaking fifty in just 14 balls, RCB signing Tim David scored 56 in just 28 balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.