Caribbean Premier League 2021 : किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard ) कधी काय करेल याचा नेम नाही... रागात प्रतिस्पर्धी खेळाडूच्या अंगावर धावणारा, अम्पायरच्या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी तोंडावर टेप बांधून मैदानावर उतरणारा पोलार्ड आपण इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पाहिला आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्येही ( CPL 2021) पोलार्डचा हाच अवतार पाहायला मिळाला. त्रिनबागो नाइट रायडर्स विरुद्ध सेंट ल्युसीआ किंग्स यांच्यातल्या सामन्यात पोलार्ड नोंदवलेल्या विचित्र निषेधाची चर्चा सुरू झाली आहे. नाइट रायडर्सच्या कर्णधाराला अम्पायरच्या निर्णयाचा राग आला, परंतु त्यानं कोणताही वाद न घालता अजब पद्धतीनं निषेध नोंदवला. दरम्यान याच सामन्यात पोलार्डनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठा विक्रमही केला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या नाइट रायडर्नं ७ बाद १५८ धावा केल्या. पोलार्डनं २९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ४१ धावा केल्या, तर टीम सेईफर्टनं ३७ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात किंग्सला ७ बाद १३१ धावा करता आल्या. आंद्रे फ्लेचर ५५ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ८१ धावा करून एकटाच रायडर्सला भिडला. त्याला इतरांकडून साथ मिळाली नाही. रवी रामपॉलनं ३, इसुरू उदानानं २ विकेट्स घेतल्या.
रायडर्सच्या डावातील १९व्या षटकात अम्पायरचा निर्णय पोलार्डला आवडला नाही. वाहब रियाझनं वाईड चेंडू टाकला पण अम्पायरनं तो वाईड दिला नाही आणि त्यामुळे नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या पोलार्डनं विचित्र निषेध नोंदवला. तो थेट ३० यार्डावर जाऊन उभा राहिला.
पाहा व्हिडीओ..