Join us  

CPL 2021: मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; सहाव्या क्रमांकावर येऊन किरॉन पोलार्डची तुफान फटकेबाजी

Caribbean Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी गतविजेत्या मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी आली आहे. संघाचा ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 3:07 PM

Open in App

Caribbean Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी गतविजेत्या मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी आली आहे. संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) हा फॉर्मात परतला आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2021) त्यानं शनिवारी त्रिंबागो नाइट रायडर्स ( Trinbago Knight Riders) संघाचे प्रतिनिधित्व करताना तुफान फटकेबाजी केली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत पोलार्डनं १९४च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी करून नाइट रायडर्सला ६ विकेट्स व १९ चेंडू राखून विजय मिळवून दिला.

बार्बाडोस रॉयल्स ( Barbados Royals) संघाचा संपूर्ण संघ १२२ धावांत गडगडला. रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( RCB)  ज्या गोलंदाजाला रिलीज केलं त्या इसुरू उदानानं २१ धावांत ५ विकेट्स घेतल्या. रवी रामपॉलनं दोन बळी टिपले. आझम खान ( ३०), ग्लेन फिलिप्स ( २४) व शे होप ( २०) यांनी संघर्ष केला. प्रत्युत्तरात रायडर्सची सुरुवात खराब झाली आणि त्यांचे ४ फलंदाज ३८ धावांवर माघारी परतले होते.  सहाव्या क्रमांकावर आलेल्या पोलार्डनं मोर्चा सांभाळला अन् ३० चेंडूंत नाबाद ५८ धावा कुटल्या. त्यानं ९ चेंडूंत ४८ ( ३ चौकार व ६ षटकार) धावा कुटून संघाला सहज विजय मिळवून दिला. दिनेश रामदिननं नाबाद २९ धावा केल्या. 

नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्याविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत पोलार्डला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानं ५८*, २, १३, २२*, ११ व २ अशा धावा केल्या.   

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगकिरॉन पोलार्डमुंबई इंडियन्स
Open in App