वेलिंंग्टन : सलामीचा फलंदाज क्रेग ब्रेथवेट व शिमरोन हेतमायर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत तिस-या दिवशी दोन बाद २१४ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिज अद्याप १७२ धावांनी पिछाडीवर आहे.
न्यूझीलंडने सकाळी नऊ बाद ४४७ धावांवर आपला डाव सुरू केला. त्यांनी नऊ बाद ५२० धावांवर डाव घोषित केला. या कसोटीत पदार्पण करणाºया टॉम ब्लंडेल याने नाबाद १०७ धावांची खेळी केली. पहिल्या डावातील धावांच्या आधारावर न्यूझीलंडने ३८६ धावांची आघाडी घेतली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव फक्त १३४ धावांतच आटोपला.
ब्रेथवेटने दुसºया डावात किरॉन पॉवेल (४०) याच्याबरोबर ७२
धावांची व हेतमायर (६६) याच्याबरोबर ९४ धावांची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांना मॅट हेन्री याने बाद केले. बेसिन रिझर्व्ह मैदानावर आज पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत हिरवळ नव्हती. त्यामुळे फलंदाजांना जास्त अडचणी येत नव्हत्या. पहिल्या दोन दिवसांत १९ विकेट पडल्या, तर तिसºया दिवशी फक्त दोनच विकेट पडल्या.
दिवसभराचा खेळ संपला तेव्हा ब्रेथवेट ७९, तर साई होप २१ धावांवर खेळत होते.
Web Title: Craig Breathett's unbeaten half-century, West Indies made 214 for two
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.