पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याला आणखी एक मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वी अख्तरची सरकारी चॅनेल PTVवर इभ्रत काढण्यात आली होती आणि आता त्याला चॅनेलनं बॅन केलं आहे. त्यामुळे आता या चॅनेलकडून प्रसारित करण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमात शोएब अख्तरला भाग घेता येणार नाही. चॅनेलनं ट्विट करून याबाबत माहिती दिली आणि PTVनं अँकर नौमान नियाज याच्यासोबत लाईव्ह शोमध्ये झालेल्या वादाची चौकशी होणार आहे. चॅनेलच्या या निर्णयामुळे अख्तरची कमाई बंद झाली आहे.
पण, यानंतर रावळपिंडी एक्स्प्रेस अख्तरनंही कठोर शब्दात त्याचे मत मांडले. त्यानं ट्विट केलं की,ही चांगली मस्करी आहे. मी २२० मिलियन पाकिस्तानी आणि जगभरातील लोकांसमोर ऑन एअर राजीनामा दिला आहे. PTV वेडी आहे काय? मला ऑफ एअर करणारे हे कोण?
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर पाकिस्तानात एका टेलिव्हिजन चॅनलवर खास क्रिकेट शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यात कार्यक्रमाच्या अँकरनं शोएब अख्तर याचा अपमान करत त्याला लाइव्ह कार्यक्रमातून निघून जायला सांगितलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमात वेस्ट इंडिजचे दिग्गज विवियन रिचर्ड्स देखील उपस्थित होते. याशिवाय पाकिस्तानचे अनेक माजी खेळाडूंचीही उपस्थिती होती.
नेमकं काय घडलं?
पाकिस्तानच्या 'पीटीव्ही' वाहिनीवर 'गेम ऑन' नावाचा शो सुरू होता. यात शोएब अख्तरनं पाकिस्तानचे गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस राऊफ यांचं कौतुक केलं. पाकिस्तान सुपर लीगमधील लाहौर कलंदर्स टीममधून हे दोन गोलंदाज पुढे आले, असं शोएब अख्तरनं म्हटलं. त्यावर कार्यक्रमाचा अँकर नौमान नियाज यांनी अख्तरला रोखलं. "शाहीन पाकिस्तानच्या अंडर-१९ क्रिकेट संघातून आला आहे", असं नौमान यांनी म्हटलं. त्यावर शोएबनं "मी हॅरीस राऊफ याच्याबाबत बोलतोय", असं म्हटलं. त्यावर नौमान यांचा पारा चढला आणि त्यांनी शोएब अख्तरचा अपमान करण्यास सुरुवात केली. "तू माझ्याशी असभ्य भाषेत बोलत आहेस. मी इथं सांगू इच्छितो की जर तुला ओव्हरस्मार्ट बनायचं आहे तर तू शोमधून निघून जाऊ शकतोस आणि हे मी तुला ऑन एअर सांगत आहे", असं नौमान म्हणाले.
ब्रेकनंतर कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात झाली आणि शोएब अख्तरनं झालेला प्रसंग सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यात काही यश आलेलं पाहायला मिळालं नाही. त्यानंतर शोएब अख्तरनं शो मधून निघून जाण्याचा निर्णय घेतला.
Web Title: Crazy or what? Shoaib Akhtar left baffled over Pakistani TV channel's decision to 'take him off-air'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.