Join us  

Team India: एकापेक्षा जास्त कर्णधार तयार केले, राहुल द्रविड यांनी सांगितली रणनीती

Rahul Dravid: आठ महिन्यांत क्रिकेटच्या सर्व प्रारूपात मिळून भारतीय क्रिकेट संघाने सहा कर्णधार पाहिले आहेत. हे नक्कीच ठरवलेले नसले तरी पण आम्ही आता जास्तीत जास्त नवे नेतृत्व करत आहोत, आम्ही एकापेक्षा जास्त कर्णधार तयार केले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 8:32 AM

Open in App

बंगळुरू : आठ महिन्यांत क्रिकेटच्या सर्व प्रारूपात मिळून भारतीय क्रिकेट संघाने सहा कर्णधार पाहिले आहेत. हे नक्कीच ठरवलेले नसले तरी पण आम्ही आता जास्तीत जास्त नवे नेतृत्व करत आहोत, आम्ही एकापेक्षा जास्त कर्णधार तयार केले, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले.द्रविड यांनी नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून भारताने विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, ऋषभ पंत आणि आता आयर्लंड दौऱ्यासाठी हार्दिक पांड्या हे कर्णधार झाले आहेत. या काळात भारतीय संघातील कर्णधारांना दुखापत होणे, कोविड-१९ बायोबबल ब्रेक, तसेच एकाच वेळी दोन देशांत स्पर्धा आयोजित केली जाणे यामुळेही हे सहा कर्णधार झाले आहेत. द्रविड यांनी सांगितले की, ‘आठ महिन्यांत सहा कर्णधार होणे हे नक्कीच आव्हानात्मक आहे. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा हे नक्कीच ठरवले नव्हते, पण शेवटी हा खेळाचा भाग आहे. आम्ही तेवढे जास्त सामने खेळत आहोत.’  

टॅग्स :राहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघ
Open in App