माझ्या पुनरागमनाचे श्रेय सचिन तेंडुलकरला- विनोद कांबळी

पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळाल्याचा आनंद आहे आणि तेवढीच उत्सुकताही वाढली आहे. खरं म्हणजे याचे सारे श्रेय मी सचिन तेंडुलकरला देईन.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 05:07 AM2018-03-14T05:07:14+5:302018-03-14T05:07:14+5:30

whatsapp join usJoin us
The credit for my retirement is Sachin Tendulkar - Vinod Kambli | माझ्या पुनरागमनाचे श्रेय सचिन तेंडुलकरला- विनोद कांबळी

माझ्या पुनरागमनाचे श्रेय सचिन तेंडुलकरला- विनोद कांबळी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळाल्याचा आनंद आहे आणि तेवढीच उत्सुकताही वाढली आहे. खरं म्हणजे याचे सारे श्रेय मी सचिन तेंडुलकरला देईन. याआधीही मी क्रिकेटशी जुळलो होतो, पण ते टीव्हीवर होतो. पण आता सचिनच्या मदतीने मी पुन्हा मैदानावर पुनरागमन केले आहे,’ असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि मुंबईकर विनोद कांबळी यांनी व्यक्त केले.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने सध्या सुरु असलेल्या पहिल्या टी२० मुंबई लीग स्पर्धेत शिवाजी पार्क लायन्स संघासाठी कांबळी मेंटॉर म्हणून जबाबदारी पाहत आहेत. तसेच शिवाजी पार्क संघासाठी माध्यम प्रायोजक म्हणून ‘लोकमत’ची निवड करण्यात आली असून यानिमित्ताने कांबळी यांनी खास ‘लोकमत’शी संवाद साधला.
कांबळी म्हणाले, ‘बरीच वर्ष टिव्हीच्या माध्यमातून क्रिकेटशी जोडल्यानंतर मैदानावर योगदान देण्याची इच्छा झाली. क्रिकेटने जे काही मला दिले आहे त्याचे परतफेड करण्याची वेळ आली होती. यासाठी मी सचिनशी चर्चा केली आणि प्रशिक्षणाकडे वळण्याचा मार्ग मिळाला. त्यातूनच मला चांगली संधी मिळाली. इतक्या मोठ्या कालावधीनंतर मुंबई लीगच्या निमित्ताने पुन्हा एका वानखेडे स्टेडियमवर उतरण्याची संधी मिळतेय, याचा सर्वात मोठा आनंद आहे.’
लीगमुळे मिळालेल्या संधीविषयी कांबळी म्हणाले, ‘या लीगचा सर्वाधिक फायदा क्लब क्रिकेटपटूंना होणार आहे. कारण त्यांना फारशा संधी मिळत नाही. विशेष म्हणजे यामुळे युवा खेळाडूंची आर्थिक बाजू भक्कम होणार असून याचा त्यांनी फायदा उचलावा. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाºया खेळाडूंसाठी मुंबई संघाची किंवा आयपीएल संघातही प्रवेश मिळू शकतो.’
त्याचप्रमाणे, ‘या लीगच्या निमित्ताने खेळाडंूभोवती मोठे ग्लॅमर निर्माण होईल. यामुळे खेळावरील त्यांचे लक्ष भरकटले गेले नाही पाहिजे. युवा खेळाडूंनी आपले सर्व लक्ष खेळाकडे आणि जे लक्ष्य बाळगले आहे त्यावर केंद्रीत केले पाहिज. तसेच चांगली कामगिरी केल्यानंतर खेळाडूंचे चाहता वर्गही वाढेल. त्यामुळे सर्वांना एवढंच सांगेल की, जेवढे तुमचे पाय जेवढे जमिनीवर राहतील तितका तुम्हाला फायदा होईल.’
>टी२०च्या तुलनेत कसोटी सामन्यात खरा कस लागतो-सिद्धेश लाड
चांगल्या सुरुवातीनंतर डेथ ओव्हर्समध्ये झालेल्या चुकीमुळे पहिली लढत गमावली पण आता आम्ही चांगले पुनरागमन केले आहे. माझ्यावर कर्णधारपदाचे कोणतेही दडपण नाही,’ असे मत शिवाजी पार्क लायन्स संघाचा कर्णधार सिध्देश लाड याने व्यक्त केले. लाड म्हणाला, ‘या स्पर्धेत पाठोपाठ सामने खेळावे लागणार असल्याचीही चिंता नाही. कारण बीसीसीआयच्या देशांतर्गत वेळापत्रकामध्येही आम्ही पाठोपाठ सामने खेळत असतो. त्यामुळे तो अनुभव आम्हाला येथे उपयोगी पडेल. तसेच ज्यांना सवय नाही त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांना तयार करत आहोत.’ स्पर्धेतील मुख्य आव्हानाविषयी लाड म्हणाला की, ‘प्रत्येक खेळाडू एकमेकांचा खेळ जणून असल्याने स्पर्धेत सर्वांपुढे अनोखे आव्हान आहे. यातून धावा काढणे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जे रणजी क्रिकेट खेळत नाहीट त्यांच्यासाठी ही स्पर्धा खूप मोठी संधी आहे.’ त्याचप्रमाणे, ‘टी२० क्रिकेट सर्वांच्या पसंतीचे असले तरी खरा कस हा कसोटी सामन्यांमध्ये लागतो. इंग्लंड, आॅस्टेÑलिया आणि द. आफ्रिका अशा देशांमध्ये भारतासाठी धावा काढण्याचे माझे लक्ष्य आहे,’ असेही लाडने यावेळी सांगितले.

Web Title: The credit for my retirement is Sachin Tendulkar - Vinod Kambli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.