पठाण बंधूंना कडक सॅल्यूट; वडोदरापाठोपाठ दक्षिण दिल्लीत कोरोनाग्रस्त कुटुंबीयांना देतायेत मोफत जेवण!

भारतात कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली आहे. गतवर्षी लॉकडाऊन केल्यानंतर कोरोनाचा आकडा कमी झाला अन् सर्वच निर्धास्त झाले. कोरोना गेला, असेच सर्व वागू लागले आणि त्या बेफिकरीचा फटक बसताना जाणवत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 05:08 PM2021-05-05T17:08:45+5:302021-05-05T17:09:58+5:30

whatsapp join usJoin us
Cricket Academy of Pathans is going to provide free meals to COVID-19 affected people in South Delhi, Irfan & Yusuf Pathan share helpline number | पठाण बंधूंना कडक सॅल्यूट; वडोदरापाठोपाठ दक्षिण दिल्लीत कोरोनाग्रस्त कुटुंबीयांना देतायेत मोफत जेवण!

पठाण बंधूंना कडक सॅल्यूट; वडोदरापाठोपाठ दक्षिण दिल्लीत कोरोनाग्रस्त कुटुंबीयांना देतायेत मोफत जेवण!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गेल्या लॉकडाऊनमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे येऊन मदत करताना सर्वांनी पाहिले. क्रिकेटपटूही त्याला अपवाद ठरले नाहीत. त्यात इरफान व युसूप ही पठाण बंधूंची जोडी अनेकांसाठी खऱ्या अर्थानं संकटमोचक ठरली. मागील लॉकडाऊनमध्ये भरभरून मदत केल्यानंतर ही जोडी पुन्हा मदतीसाठी सक्रीय झाली आहे. वडोदरा पाठोपाठ आता ही जोडी दक्षिण दिल्लीत कोरोना बाधित व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत जेवण देण्याच काम करत आहेत. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून हेल्पलाईन नंबर शेअर केला आहे. रिषभ पंतनं रचला इतिहास; महेंद्रसिंग धोनीला जे १५ वर्षांत जमलं नाही ते यानं अडीच वर्षांत केलं!

गरीबीतून वर आलेल्या पठाण कुटुंबीयांनी समाजाप्रती असलेली जबाबदारी योग्य रितीनं पार पाडली आहे. गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात गरजूंसाठी पठाण बंधूंनी 10 किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटे दान करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय त्यांनी वडोदरा येथील विविध हॉस्पिटल्सनानं PPE किट्स व मास्कचे वाटपही केलं होतं. आता कोरोना संकट पुन्हा डोकं वर काढत असताना या दोघांनी वडिलांच्या नावानं सुरू असलेल्या Mehmoodkhan S Pathan Public Charitable Trustच्या माध्यमातून वडोदरा येथील कोरोना रुग्णांना मोफत अन्न पुरवण्याचे काम सुरू केले आहे. Fact Check : महेंद्रसिंग धोनीनं IPL २०२१मधून मिळणारा १५ कोटींचा पगार कोरोना लढ्यासाठी केला दान!

त्यापुढे आणखी एक पाऊल टाकताना क्रिकेट अकादमी ऑफ पठाण्स ( Cricket Academy of Pathans ) च्या माध्यमातून दक्षिण दिल्लीतील कोरोना बाधितांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत जेवण देणार आहेत.  



युसूफनं भारताकडून ५७ वन डे व २२ ट्वेंटी-२० सामने खेळले. वन डे त त्यानं दोन शतकं व ३ अर्धशतकांसह ८१० धावा केल्या. शिवाय ३३ विकेट्स घेतल्या.  इरफाननं २९ कसोटीत ११०५ धावा आणि १०० विकेट्स घेतल्या. १२० वन डे व २४ ट्वेंटी-20 सामन्यांत त्याच्या नावावर अनुक्रमे १५४४ धावा व १७३ विकेट्स आणि १७२ धावा व २८ विकेट्स आहेत.  

Web Title: Cricket Academy of Pathans is going to provide free meals to COVID-19 affected people in South Delhi, Irfan & Yusuf Pathan share helpline number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.