मुंबई - क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्रच्यावतीने महाराष्ट्र राज्याच्या अंध क्रिकेट महिला व पुरुष संघाना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी अभिनेते बोमन इराणी, अभिनेत्री पारूल चौधरी, आइसलँडचे राजदूत गुल कृपलानी , सोनी चॅनेल सीएसआरचे प्रमुख राजकुमार बिडवाटका, ऑल इंडिया मीडिया एम्प्लॉईस असोसिएशनचे अध्यक्ष गौरक्ष धोत्रे हे उपस्थित होते.
ज्ञानेश्वर हांडे, दिलीप मुंडे, स्वप्नील वाघ, अमोल खर्चे, प्रवीण कुर्लुके, अनिल बेलसरे या सहा भारतीय अंध क्रिकेट संघातील आजी माजी खेळाडूंचा सन्मान या वेळी करण्यात आला. तसेच राज्यातून पुरुष विभागातून राहुल महाले (चाळीसगाव), महिला विभागातून चंद्रकला शिरतोडे (सातारा) आणि शालेय विभागातून श्रीराम पालवे(चिखलदरा) अश्या सर्वातम खेळाडूंना विशेष पुरस्कार देवून गौरवण्यात आले. पुरस्कार स्वरूप रोख रक्कम पंधरा हजार तसेच प्रशातीपत्रक देण्यात आले.
या प्रसंगी बोलताना जेष्ठ अभिनेते बोमन इराणी म्हणाले “खर तर या खेळाडूना प्रोस्ताहन देण्यासाठी मला इथे बोलावले होते पण यांची जिद्ध पाहता मलाचा त्यांचाकडून प्रोस्ताहन मिळाले आहे. भविष्यात क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्रच्या वाटचालीत माझी सोबत नेहमीच राहील, असे यावेळी नमूद केले.
क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्रचे महासचिव रमाकांत साटम यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करताना. या अश्या अनेक व्यक्ती सोबत जोडले गेल्यानेच आज आपण इथ पर्यंत पोहोचलो आहोत. आपल्या राज्यातून भविष्यात अधिकाधिक खेळाडू देशासाठी खेळवण्याचा मानस या निमित्ताने त्यांनी बोलवून दाखवला.