नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. अशातच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत दौऱ्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. कॅमेरून ग्रीन आणि मिचेल स्टार्क या संघात पुनरागमन करत आहेत. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान हे दोन्ही खेळाडू जखमी झाले होते. मात्र, या दोघांचाही भारत दौऱ्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू अजूनही दुखापतीतून सावरू शकलेले नाहीत. पण भारत दौऱ्याला अजून एक महिना बाकी आहे. तोपर्यंत हे दोन्ही खेळाडू तंदुरुस्त होतील अशी अपेक्षा आहे.
आगामी कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागेल. अशा स्थितीत दोन्ही संघासमोर कडवे आव्हान असणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा मास्टर स्ट्रोक
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाने एक मास्टर स्ट्रोक खेळला आहे. कारण युवा स्टार टॉड मर्फीचा कांगारूच्या संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाने ॲश्टन अगर, मिचेल स्वेपसन आणि नॅथन लायन यांचाही आपल्या संघात समावेश केला आहे. एकूणच 4 फिरकी गोलंदाजांसह ऑस्ट्रेलियन संघ भारताविरूद्ध कसोटी खेळणार आहे.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार, ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.
बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी मास्टरकार्ड ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघाच्या घरच्या मालिकेचा शेवट वन डे मालिकेतून होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
- 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
- 17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
- 1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला
- 9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद
ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका
- 17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई
- 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
- 22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Cricket Australia has announced the Australian team under the leadership of Pat Cummins for the tour of India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.