ऑस्ट्रेलिया लागली कामाला! वन डे विश्वचषक आणि भारताविरूद्धच्या मालिकेसाठी उतरवला तगडा संघ

IND vs AUS ODI : २२ सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे मालिका खेळवली जाणार आहे.  

By ओमकार संकपाळ | Published: August 7, 2023 12:09 PM2023-08-07T12:09:06+5:302023-08-07T12:09:35+5:30

whatsapp join usJoin us
Cricket Australia has announced three T20s against South Africa and an 18-player squad for the 2023 ODI World Cup, as well as two lead-in series against South Africa and India | ऑस्ट्रेलिया लागली कामाला! वन डे विश्वचषक आणि भारताविरूद्धच्या मालिकेसाठी उतरवला तगडा संघ

ऑस्ट्रेलिया लागली कामाला! वन डे विश्वचषक आणि भारताविरूद्धच्या मालिकेसाठी उतरवला तगडा संघ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आगामी वन डे विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी कांगारूच्या संघाची घोषणा झाली आहे. भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकापूर्वी यजमान भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरूद्ध अग्निपरीक्षा असणार आहे. कारण ५ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या वन डे विश्वचषकापूर्वी टीम इंडिया बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. खरं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ सप्टेंबरपासून तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेनंतर दोन्हीही संघ विश्वचषक खेळतील. मग पुन्हा एकदा ट्वेंटी-२० मालिकेत हे संघ आमनेसामने असतील. ऑस्ट्रेलियन संघ या महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. 
 
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - 
मिचेल मार्श (कर्णधार), सीन अबॉट, जेसन बेहरड्रॉफ, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, आरोन हार्डली, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगिल्स, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, ॲडम झाम्पा. 

भारत, दक्षिण आफ्रिका आणि वन डे विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), सीन अबॉट, ॲश्टन अगर, अलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, आरोन हार्डली, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिड हेड, जोश इंगिल्स, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर सांघा, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा. 

वन डे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
२२ सप्टेंबर, शुक्रवार - मोहाली, दुपारी १.३० वाजल्यापासून
२४ सप्टेंबर, रविवार - इंदौर, दुपारी १.३० वाजल्यापासून 
२७ सप्टेंबर, बुधवार - राजकोट, दुपारी १.३० वाजल्यापासून

ट्वेंटी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 

२३ नोव्हेंबर, गुरूवार - वायझॅग, सायंकाळी ७ वाजल्यापासून
२६ नोव्हेंबर, रविवार, त्रिवेंद्रम, सायंकाली ७ वाजल्यापासून
२८ नोव्हेंबर, मंगळवार, गुवाहाटी, सायंकाळी ७ वाजल्यापासून
१ डिसेंबर, शुक्रवार, नागपूर, सायंकाळी ७ वाजल्यापासून
३ डिसेंबर, रविवार, हैदराबाद, सायंकाळी ७ वाजल्यापासून
 
 

Web Title: Cricket Australia has announced three T20s against South Africa and an 18-player squad for the 2023 ODI World Cup, as well as two lead-in series against South Africa and India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.