भारतीय संघानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या कसोटीत विजय मिळवून २०२१ वर्षाचा शेवट गोड केला. पण, वैयक्तिक कामगिरीचा विचार केल्यास विराटसाठी हे वर्ष तितके खास राहिले नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं २०२१मधील सर्वोत्तम कसोटी एकादश संघ जाहीर केला आणि त्यात विराटला स्थान मिळालेले नाही. पण, भारताच्या चार खेळाडूंनी या संघात स्थान पटकावले आहे. श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्ने याची कर्णधार म्हणून निवड केली आहे. या संघात पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या फक्त मार्नस लाबुशेनला स्थान पटकावता आले आहे.
सलामीवीर म्हणून रोहित शर्मा व करुणारत्ने यांची निवड केली गेली आहे. रोहितनं या वर्षात दोन शतकं व चार अर्धशतकं झळकावली आहेत आणि ४७.६८च्या सरासरीनं ९०६ धावा केल्या आहेत. करुणारत्नेनं ही कसोटीत ६९.३८च्या सरासरीनं ९०२ धावा केल्या आहेत. त्यात ४ शतकं व ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
मधल्या फळीत लाबुशेनसह इंग्लंडचा कर्णधार जो रूट व पाकिस्तानचा फवाद आलम यांना संधी दिली गेली आहे. लाबुशेननं ६५.७५च्या सरासरीनं २ शतकं व ४ अर्धशतकांसह ५२६ धावा केल्या आहेत. जो रुटनं यंदाचे वर्ष गाजवलेतय. कसोटीत त्याच्या नावावर ६ शतकं आणि ४ अर्धशतकं आहेत आणि त्यानं ६१ च्या सरासरीनं १७०८ धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा आलमनं ५७.१०च्या सरासरीनं ५७१ धावा केल्या आहेत. त्यात ३ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे.
यष्टिरक्षक म्हणून
रिषभ पंतची निवड करण्यात आली आहे. या वर्षी त्यानं ३९.३६च्या सरासरीनं ७४८ धावा केल्या आहेत, तर ३० झेल व ६ स्टम्पिंग्सही त्याच्या नावावर आहेत.
आर अश्विन व अक्षर पटेल या दोन फिरकीपटूंनी या संघात स्थान पटकावले आहे. अश्विननं या वर्षात ९ सामन्यांत ५४ विकेट्स, तर अक्षरनं ५ सामन्यांत २७ विकेट्स घेतल्या आहेत. जलदगती गोलंदाजांमध्ये कायले जेमिन्सन, शाहिन आफ्रिदी आणि हसन अली यांची निवड केली आहे. जेमिन्सननं ५ सामन्यांत २७, आफ्रिदीनं ९ सामन्यांत ४७ आणि हसन अलीनं ८ सामन्यांत ४१ विकेट्स घेतल्या आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा कसोटी एकादश संघ -
रोहित शर्मा, दिमुथ करुणारत्ने ( कर्णधार), मार्नस लाबुशेन, जो रुट, फवाद आलम,
रिषभ पंत ( यष्टिरक्षक),
आर अश्विन, कायले जेमिन्सन, अक्षर पटेल, हसन अली, शाहिन शाह आफ्रिदी ( Cricket Australia Test XI of 2021: Rohit Sharma, Dimuth Karunaratne (c), Marnus Labuschagne, Joe Root, Fawad Alam, Rishabh Pant (wk), Ravi Ashwin, Kyle Jamieson, Axar Patel, Hasan Ali, Shaheen Shah Afridi)
Web Title: Cricket Australia names Best Test XI of 2021; R Ashwin, Rohit Sharma among 4 Indians included in list
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.