कोरोना व्हायरसनं जगाला वेठीस धरलं आहे. जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 38 लाख 21,494 इतका झाला आहे. त्यापैकी 13 लाख, 03,692 रुग्ण बरे झाले असून 2 लाख 65,115 जणांचा प्राण गमवावे लागले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. भारतातही 17 मे पर्यंल लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण, क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया नव्या नियमांनुसार मे महिन्याच्या अखेरीस खेळाडूंच्या सराव सत्राचे आयोजन करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
खेळाडूही सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही नवीन नियम तयार करत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉक्टर जॉन आर्चर्ड आणि sports science and sports medicineचे प्रमुख अॅलेक्स कोंटूरिस यांच्या देखरेखीखाली हा सराव सुरू होणार आहे. पण, या सराव सत्रात चेंडू चमकावण्यासाठी लाळ आणि घामाचा वापर होणार नसल्याचे स्पष्ट केले गेले आहे. त्यामुळे त्यासाठी पर्याय शोधला जात आहे.
कोंटूरिस यांनी सांगितले की,''फिजिकल डिस्टन्स राखण्यात येईल. प्रत्येक नेट्समध्ये दोन किंवा तीन गोलंदाज असतील. 22 यार्डाच्या खेळपट्टीवर एक गोलंदाज असल्यास काहीच हरकत नाही. खेळाडू विकेटचे सेलिब्रेशन करण्यासाठी नवीन पर्याय नक्की शोधतील.''
Mohammed Shamiचं नाव का बदनाम करतेस? हसीन जहाँच्या नव्या व्हिडीओवर नेटिझन्स संतापले
रोहित शर्मानं दिली Good News; मोठ्या आनंदात केलं नव्या पाहुण्याचं स्वागत
Sachin Tendulkarसाठी कन्येनं बनवली स्पेशल डिश; 60 सेकंदात फस्त
...जणू काही मूल झाल्याशिवाय स्त्रीच्या जन्माचं सार्थकच होत नाही; Sania Mirza ची '(वु)मन की बात'
Video : ऐ खुदा, तुने तो हमे हैरान कर दिया!; Harbhajan Singhची कविता व्हायरल