क्रिकेट ऑस्ट्रेलियानं गुरूवारी भारताविरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं. भारतीय संघाव्यतिरिक्त क्रिकेट ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करणार आहे. पण, कोरोना व्हायरसच्या संकटात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबतचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) 10 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. त्यात आता क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलेलं वेळापत्रक अंतिम नसून त्यात बदल होईल, असे विधान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) केलं जात आहे.
पण, बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाल यांनी जर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप न झाल्यास वेळापत्रकात बदल होईल असं सांगितले. ट्वेंटी-20 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघ तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धा आणि त्यानंतर चार कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. पण, जर वर्ल्ड कप न झाल्यास ट्वेंटी-20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो.
धुमाल म्हणाले,''आठ वर्षांचा FTP आधीच ठरवण्यात आला आहे. त्यामुळे जर ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होत नसेल, तर ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात जाण्यात काय अर्थ. त्यानंतर परत या आणि परत जा. FTP नुसार आम्ही जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहोत. जर खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं योग्य असेल तर दौरा केला जाईल. सध्यातरी काहीच रद्द झालेले नाही.'' पाहा संपूर्ण वेळापत्रकट्वेंटी-20 मालिका11 ऑक्टोबर - ब्रिस्बेन14 ऑक्टोबर - कॅनबेरा17 ऑक्टोबर - अॅडलेड कसोटी मालिकावि. भारत, गॅबा, 3 ते 7 डिसेंबरवि. भारत, अॅडलेड, 11 ते 15 डिसेंबरवि. भारत, मेलबर्न, 26- 30 डिसेंबरवि. भारत, सिडनी, 3 ते 7 जानेवारी 2021
वन डे मालिका12 जानेवारी 2021 - पर्थ15 जानेवारी 2021 - मेलबर्न17 जानेवारी 2021 - सीडनी
अन्य महत्त्वाच्या बातम्या
टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा अपघात; गाडीची अवस्था पाहून उडेल थरकाप!
भाजपा खासदार गौतम गंभीरच्या वडिलांच्या गाडीची चोरी
सोशल अकाऊंटवरून पॉर्न क्लिप व्हायरल; पाकिस्तानी गोलंदाज ट्विटवर होतोय ट्रेंड!
हरभजन सिंगची मस्करी करणं विराट कोहलीला पडलं महाग; फिरकीपटूनं दिलं चॅलेंज
भारत मुद्दाम वर्ल्ड कपचा तो सामना हरला!; पाक क्रिकेटपटूच्या राजकारणाला बेन स्टोक्सचे सडेतोड उत्तर
हजार फुटांवरून त्यानं सहकाऱ्याला फेकलं; शोएब अख्तरनं शेअर केला थरकाप उडवणारा Video