कराची : क्रिकेटला भ्रष्टाचारमुक्त ठेवण्यासाठी क्रिकेट मंडळाला सर्वच फ्रँचाइजी आधारित टी-२० लीग लढतींवर नजर ठेवावी लागेल आणि खेळाडूंना जागृत करावे लागेल, असे मत पाकिस्तानचा माजी मुख्य प्रशिक्षक वकार युनूसने व्यक्त केले आहे.
इस्लामाबाद युनायटेड आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाला फेब्रुवारी महिन्यात मानहानीला सामोरे जावे लागले होते. त्या वेळेस राष्ट्रीय संघातील दोन फलंदाज शरजील खान आणि खालीद लतीफ पाकिस्तान सुपर लीगच्या दुसºया सत्रात स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळले होते. या दोघांनी सट्टेबाजांची भेटही घेतली होती. इस्लामाबादच्या या दोन्ही खेळाडूंना निलंबित करण्यात आले होते व त्यानंतर त्यांच्यावर पाच वर्षांची बंदी लादण्यात आली होती.
पीएसएलच्या तिसºया पर्वात इस्लामाबाद युनायटेडचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्रिकेट संचालक वकार युनूस म्हणाला, ‘स्पॉट फिक्सिंगचा धोका सर्वच खेळांसाठी कॅन्सरसारखा आहे. याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी बोर्डाने उपाय करायला हवे. आम्ही आमच्या संघावर कडवी नजर ठेवण्याची व्यवस्था लागू केली आहे. या वेळेस पीएसएलमध्ये असे काहीही घडणार नाही याचा आम्हाला विश्वास आहे.’
Web Title: Cricket Board should keep an eye on T20 league to prevent corruption: Waqar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.