Join us  

क्रिकेट मंडळाने केले तीन मोठ्या अधिकाऱ्यांना निलंबित; पण असे घडले तरी काय

या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासारखे नेमकं झालंय तरी काय, याचा विचार चाहते करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 2:05 PM

Open in App

मुंबई : क्रिकेट संघटनेने आपल्या तीन मोठ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये क्रिकेट संचालकांचाही समावेश आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. पण या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासारखे नेमकं झालंय तरी काय, याचा विचार चाहते करत आहेत.

क्रिकेट मालिका काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या मालिकेच्या काही दिवसांपूर्वी जर मोठ्या अधिकाऱ्यांचे निलंबन झाले तर कामकाज कसे चालणार, हा मोठा प्रश्न आहे. पण काही कारणास्तव या तीन अधिकाऱ्यांना आपल्या पदापासून तात्काळ हटवण्यात आले आहे.

या तीन अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी खेळाडूंना त्यांचे पैसे न दिल्यामुळे निलंबित करण्यात आले असल्याचे समजते. गेल्या वर्षी एका लीगमध्ये खेळाडू खेळले होते. त्यावेळी त्यांना देण्यात येणारे पैसे हे तीन अधिकारी देणार होते. पण या अधिकाऱ्यांनी खेळाडूंना पैसे न दिल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या मंडळाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी ही मोठी कारवाई केली आहे.

काही जणांना वाटत होते की, दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाची कामगिरी निराशाजनक झाली होती. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला भारतामध्ये एकही मालिका जिंकता आली नव्हती. या कारणास्तव या तिन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले हा, असा संशय बऱ्याच जणांना आला होता. पण त्यांच्यावरील निलंबन हे स्थानिक लीगमधील पैसे खेळाडूंना देण्यात न आल्यामुळे करण्यात आले आहे.

टॅग्स :द. आफ्रिकाबीसीसीआय