Join us  

शतकवीर स्वातंत्र्यसैनिकास क्रिकेटमधील शतकवीर सचिनची मानवंदना, १०० वाढदिवशी दिल्या खास शुभेच्छा...

Sachin Tendulkar gave birthday wish to freedom fighters Marpatrao Prabhu : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले आणि आता वयाची शंभरी पूर्ण करणारे स्वातंत्र्यसैनिक मर्पतराव प्रभू यांना त्यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त सचिनने खास व्हिडीओमधून शुभेच्छा दिल्या आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 11:38 AM

Open in App

मुंबई - महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आपल्या क्रिकेटच्या मैदानातील वर्तनासोबतच मैदानाबाहेरच्या वागणुकीमधून क्रिकेटप्रेमींमध्ये मानाचे स्थान मिळवलेले आहे. (Marpatrao Prabhu) आता मास्टर ब्लास्टर सचिनने केलेल्या एका कृतीमुळे त्याच्याविषयीचा चाहत्यांच्या मनात असलेला आदर अधिकच वाढणार आहे. (Cricket centurion Sachin Tendulkar gave birthday wish to freedom fighters Marpatrao Prabhu )देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले आणि आता वयाची शंभरी पूर्ण करणारे स्वातंत्र्यसैनिक मर्पतराव प्रभू यांना त्यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त सचिनने खास व्हिडीओमधून शुभेच्छा दिल्या आहे. मर्पतराव प्रभू हे मुळचे गोव्यातील असलेले मर्पतराव वयाच्या १२ व्या वर्षापासून मुंबईत राहत आहे. दरम्यान वयाच्या २१ व्या वर्षी ते चले जाव चळवळीत सहभागी झाले होते. तर वयाच्या उत्तरार्धात ते सचिनच्या फलंदाजीचे निस्सिम चाहते बनले आहेत.मर्पतरावांना दिलेल्या आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये सचिन म्हणाला की, नमस्कार तुम्हाला १०० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आधीही व्हिडीओ मेसेज तयार केलेत, पण हा मेसेज माझ्यासाठी खास आहे. मला माझ्या भावाने सांगितलं की, तुम्ही क्रिकेट फॉलो करता. मी चांगाल खेळ करावा म्हणून तुम्ही उपवास ठेवलेला आहे. तुपाचा दिवा लावलेला आहे. अशा गोष्टी जेव्हा आयुष्यात घडतात. ऐकण्यात येतात तेव्हा खूप बरं वाटतं. त्यामधून एक वेगळीच प्रेरणा मिळते.

दरम्यान, सचिनने दिलेल्या शुभेच्छांबाबत प्रतिक्रिया देताना मर्पतरावर प्रभू यांनी सांगितले की, मिस्टर सचिन मी तुमचा ओल्डेस्ट फॅन आहे. तुम्ही जेव्हा शतक फटकवायचा तेव्हा मी देवाला प्रार्थना करायचो. तुम्हाला भेटायची माझी फार इच्छा आहे, असेही मर्पतराव यांनी सांगितले.

टॅग्स :सचिन तेंडुलकरभारत