नवी दिल्ली - कुठल्याही खेळात प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी आवश्यक असतो, तो सराव आणि अचूक रणनीती. मात्र, टीम इंडियाच्या एका कोचने खेळाडूंना सामन्या पूर्वी चक्क सेक्स करण्याचा सल्ला दिला होता. या घटनेचा खुलासा स्वतःच संबंधित कोचनेच केला आहे. टीम इंडियाचे माजी मेंटल आणि कंडिशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टन (Paddy Apton) यांनी आपल्या ‘द बेअरफूट कोच’ (The Bearfoot Coach) या पुस्तकात हा खुलासा केला आहे. आपण भारतीय संघाच्या खेळाडूंना सामन्यापूर्वी सेक्स करण्याचा सल्ला दिला होता, असे त्यांनी लिहिले आहे. (Cricket coach paddy upton advised the team india's players to do sex before the match)
आपल्या पुत्सकात पॅडी अप्टन म्हणतात, “ आपण भारतीय संघाच्या खेळाडूंना सेक्सचा सल्ला दिल्यानंतर तत्कालीन मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन नाराज झाले होते.” मात्र, यानंतर पॅडी यांनी त्यांच्या या सल्ल्यावर दिलगिरीही व्यक्त केली होती. गॅरी कर्स्टन यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने 2011 मध्ये श्रीलंकेला नमवून तब्बल 28 वर्षानंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
पाकिस्तानी खेळाडूंना मिळणारा पगार पाहून बसेल धक्का; तुम्हीच ठरवा भारतीय खेळाडूंच्या पगाराशी होईल का तुलना!
नाराज झाले होते गॅरी -
यावर पॅडी यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे, की भारतीय क्रिकेटर्सना सेक्ससंदर्भात जे काही सांगितले होते ती केवळ एक सूचना होती. एका विषयावर बोलताना आपण हा सल्ला दिला होता. पण त्यांचा हा सल्ला गॅरी यांना समजल्यानंतर ते अत्यंत संतापले होते. यानंतर बऱ्याच दिवसांनी पॅडी अप्टन यांनाही आपली चूक लक्षात आली. मी त्यावेळी असे बोलायला नको होते, असेही त्यांनी मान्य केले होते. अप्टन हे राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षकही राहिले आहेत.
किरॉन पोलार्डच्या तडाख्यानं द. आफ्रिकेचा पालापाचोळा; ड्वेन ब्राव्हो व ख्रिस गेलचाही करिष्मा
पॅडी यांनी आपल्या पुस्तकात राहुल द्रविड आणि गौतम गंभीर सारख्या खेळाडूंचाही उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे, की तेव्हा टीम इंडिया 2009 च्या तयारीत होती. तेव्हा, खेळाडूंसाठी नोट्स तयार करताना मी त्यांना संक्ससंदर्भात माहितीही दिली होती. त्यांनी त्यांच्या या पुस्तकाच्या ‘इगो अँड ग्रेटेस्ट प्रोफेशनल एरर’ मधील प्रकरणात यासंदर्भात भाष्य केले आहे.
Web Title: Cricket coach paddy upton advised the team india's players to do sex before the match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.