Fans Trolled BCCI After 10 Pointer Guidelines : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) खेळाडूंसाठी नवी नियमावली तयार केली आहे. खेळाडूंनी काय करावे अन् काय करू नये यासंदर्भात बीसीसीआयने १० पॉइंट्सच्या माध्यमातून खेळाडूंना वटणीवर आणण्याचा प्लान आखलाय. बीसीसीआयच्या नव्या रणनितीची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मजेशीर कमेंट्स अन् भन्नाट मीम्स
देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यापासून ते अगदी टीम इंडियाच्या ताफ्यात असताना खेळाडूकडून काय अपेक्षित आहे, याचा उल्लेख या नव्या नियमावलीत करण्यात आला आहे. यावर सोशल मीडियावर बीसीसीआयला ट्रोल करत नेटकरी खेळाडूंचीही मजा घेत आहेत. मजेशीर कमेंट्स अन् भन्नाट मीम्स तुफान व्हायरल होऊ लागल्या आहेत.
BCCI च्या नव्या नियमावलीनंतर गौतम गंभीर
बीसीसीआयच्या १० सूत्री नियमावलीनंतर गौतम गंभीरच्या वेगवेगळ्या मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. शाळेतील गुरजी अन् त्यामागे बसलेले विद्यार्थी या सीनसह काही भन्नाट मीम्स पाहायला मिळत आहेत. गौतम गंभीर आणि खेळाडू यांच्यातील हा सीन बीसीसीआयच्या नियमासह खेळाडू आणि कोचची फिरकी घेणारा आहे.
बरं झालं अश्विन निवृत्त झाला,नाहीतर...
सोशल मीडियावर काही वापरकर्ते अश्विनचा उल्लेख करून त्याने निवृत्ती घेतली नसती तर बीसीसीआयला आणखी एक १० सूत्री नियमावली ११ सूत्री करावी लागली आहे, असा टोला मारला आहे. या अकराव्या नियमात अश्विनच्या यूट्यूबवर बंदी आली असती. यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून अश्विन बिनधास्त 'बोलंदाजी' करताना पाहायला मिळाले आहे. लागला असता, असे म्हटले आहे. यात
बीसीसीआय पेक्षा शाळा बरी!
बीसीसीआय आता खेळाडूंच्या फोनच्या वापरावर आणि जेवणासाठी आउटिंगला जाण्यावरही निर्बंध घालणार का? वापरावरही बंदी घालणार आहे का? भारतीय क्रिकेट नियामक मंडळापेक्षा शाळा बरी, या आशयाच्या काही मजेशीर कमेंट्सही नियमावलीनंतर उमटताना दिसते. बीसीसीआयनं खेळाडूंची शाळा घ्यायचं ठरवलंच असेल तर आता त्यांच्यासाठी हॉस्टेलही बांधा अन् त्यांना साडे सहा वाजता उठवायला सुरुवात करा, अशा आशच्याच्या काहीप्रतिक्रियाही पाहायला मिळते.