Join us  

क्रिकेट : मुंबई पोलीस जिमखाना – एव्हरग्रीन यांच्यात अंतिम झुंज रंगणार

आता २ आणि ३ जानेवारीला शिवाजीपार्क जिमखाना येथे अंतिम फेरीची लढत खेळविली जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 8:02 PM

Open in App

मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने खेळविल्या जाणाऱ्या संतोष कुमार घोष ट्रॉफी (१६ वर्षाखालील) क्रिकेट स्पर्धेत मुंबई पोलीस जिमखाना आणि एव्हरग्रीन स्पोर्ट्स क्लब यांच्यात अंतिम झुंज रंगणार आहे. काल २४५ धावावर रोखले गेलेल्या मुंबई पोलीस संघाने आज अत्यंत चुरशीच्या लढतीत शिवाजी पार्क जिमखाना संघाला २२९ धावांवर रोखून पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य लढतीत एव्हरग्रीन स्पोर्ट्स क्लब संघाने पहिल्या डावात २७६ धावा केल्यानंतर आज युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाला १२३ धावांत गुंडाळत पहिल्या डावात आघाडी घेवून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आता २ आणि ३ जानेवारीला शिवाजीपार्क जिमखाना येथे अंतिम फेरीची लढत खेळविली जाणार आहे.

मुंबई पोलीस आणि शिवाजी पार्क जिमखाना यांच्यातील लढतीत आज चांगलीच चुरस पाहायला मिळाली. २४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिवाजी पार्क जिमखाना संघाने एकावेळी ६२ धावांत ३ बळी गमावले होते. मात्र त्यानंतर वरून रागजी (१० चौकारांसह ९५ धावा) आणि प्रतिक कोनकर (५५) यांनी चौथ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी करून मुंबई पोलिसांच्या तोंडचे पाणी पळवले होते. मात्र लेगब्रेक गोलंदाज दुबे याने शतकाकडे कूच करणाऱ्या रागजीला तंबूचा रस्ता दाखविला आणि पुन्हा एका पोलीस संघ सामन्यात परतला. प्रतिककोनकरला नंतर झेनिथ सचदेवच्या डावखुरया फिरकीने चकवले आणि शिवाजी पार्क जिमखाना संघ २२९ धावांत गारद झाला. झेनिथ सचदेव याने ६९ धावांत ५ तर आकाश दुबेने ७१/३ व अतिफ खानने ४७/२ बळी मिळवत संघाच्या यशात सिंहाचा वाट उचलला. ६८ धावा आणि २ बळी मिळविणारा आतिफ खान हा सामनावीर ठरला.

दुसऱ्या उपांत्य लढतीत एव्हरग्रीनच्या २७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युनायटेड क्रीएत क्लब संघ १२३ धावातच गारद झाला. आर्यन आगले (३८) याचा अपवाद वगळता त्यांचे अन्य फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. डावखुरा फिरकी गोलंदाज साद शेख याने ३२/३ बळी मिळवीले तर अक्षत पथक, शाकीर शेखांनी मित जैन यांनी प्रत्येकी २-२ बळी मिळवत त्याला मोलाची साथ दिली. सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शतकवीर सुमित मिश्रा याची निवड करण्यात आली.

संक्षिप्त धावफलक

 मुंबई पोलीस जिमखाना – ५८.२ षटकात सर्वबाद २४५ (युगगाला २८, हिरल पांचाल २९, आतिफ खान ६८, खुश जैन ५१; ओमकार करंदीकर९० धावांत ६ बळी, अथर्व भगत ३९/२) वि. वि. शिवाजीपार्क जिमखाना – ८६.३षटकात सर्वबाद २२९ (समीप मिसाळ ३१, वरून रागजी ९५, प्रतिक कोनकर ५५;झेनिथ सचदेव ६९/५, आकाश दुबे ७१/३, अतिफ खान ४७/२) सामनावीर – अतिफखान.

एव्हरग्रीन सी.सी. – ७७.१ षटकात सर्वबाद २७६ (सुमीत मिश्रा १०१, यश सबनानी३७, पूजन राऊत ३८, वैष्णव नखाते ३३; भारत दोराई राजन ३९/४ , अक्षय तळेकर६८ /३, अंशुमन सुरेश ८६/२) वि.वि. युनायटेड क्रिकेट क्लब- ६०.१ षटकात सर्वबाद१२३ (आर्यन आगले ३८, साद सेख ३२/२, अक्षत पाठक १३/२, शाकीर शेख १५/२,मित जैन ७/२) सामनावीर – सुमीत मिश्र

टॅग्स :मुंबई