Cricket Funny Video: क्रिकेटच्या मैदानावर बॅटने धावांचा पाऊस पडला तर त्यात काहीच नवल नाही. लाईव्ह मॅच दरम्यान फलंदाज तुफान फटकेबाजी करत असल्याचे अनेक फोटो व्हायरल होतात. काही वेळा फटकेबाजी करताना फलंदाजाच्या बॅटचा तुकडा उडण्याचाही प्रसंग घडतो. हे बहुतांशी वेगवान गोलंदाजांच्या चेंडूवर घडते. जेव्हा वेगवान गोलंदाज 140 किमी प्रतितास, 145 किमी प्रतितास किंवा 150 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकतो त्यावेळी वेगामुळे बॅट मारताना बॅटचा कपचा उडतो. पण स्पिनर गोलंदाजाच्या बॉलिंगच्या वेळी थेट अख्खी बॅटच हँडममधून तुटून खाली पडल्याचं तुम्ही कधी पाहिलंय? पण असा एक प्रकार नुकताच घडला.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शॉट खेळण्यापूर्वीच फलंदाजाची बॅट तुटते. असं दृश्य पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होताना दिसतोय. मुख्य म्हणजे चेंडू लागण्यापूर्वीच फलंदाजाची बॅट मधून तुटल्याने सारेच अचंबित होत असल्याचं दिसतंय.
बॅटचा खेळ खल्लास... पाहा तो व्हिडीओ-
व्हायरल व्हिडिओमध्ये एक फिरकी गोलंदाज गोलंदाजी करत आहे. पण त्याचा चेंडू फलंदाजाच्या बॅटलाही लागत नाही आणि बॅट तुटते. हे पाहून खुद्द फलंदाजालाही आश्चर्य वाटतं. कदाचित तो विचार करत असेल की त्याची बॅट किती कमकुवत आहे. चेंडू न मारताच बॅट तुटताना पाहून विकेटच्या मागे उभ्या असलेल्या कीपरला आणि फिल्डरलाही आश्चर्य वाटते. व्हिडिओ पाहिल्यानंतर तो इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटचा असू शकतो, असे वाटते. फलंदाजाची बॅट तुटली आहे पण सुदैवाने बॅट स्टंपवर न पडल्याने तो बाद होण्यापासून वाचला हेच त्याचं भाग्य. बॅट जर स्टंपवर पडली असती तर फलंदाजला पॅव्हेलियनमध्ये परत जावं लागलं असतं.