Join us

सचिन तेंडुलकरची Madame Tussauds ला भेट, स्वतःच्या मेणाच्या पुतळ्यासोबत पोझ

भारत-पाकिस्तान यांच्यातली लढत पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर पत्नी अजंली आणि लेक सारा यांच्यासह न्‍यूयॉर्कमधील नासाऊ कंट्री इंटरनॅशनल क्रिकेट स्‍टेडियमवर उपस्थित होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 17:47 IST

Open in App

न्‍यूयॉर्क - महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) त्याच्या न्यूयॉर्क दौऱ्यावर मेर्लिन एंटरटेन्‍मेंटच्‍या Madame Tussauds ला भेट दिली. येथे त्याने स्वतःचा मेणाचा पुतळा पाहून आनंदित झाला. भारत-पाकिस्तान यांच्यातली लढत पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर पत्नी अजंली आणि लेक सारा यांच्यासह न्‍यूयॉर्कमधील नासाऊ कंट्री इंटरनॅशनल क्रिकेट स्‍टेडियमवर उपस्थित होता.

यावेळी सचिन तेंडुलकरने चाहत्यांना भेट दिली. २०१४ मध्‍ये मादाम तुसाद येथे सचिनच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा वॅक्स म्युझियमच्या लॉबीमध्ये प्रदर्शित केला जाईल.  १० ते २९ जून या कालावधीत तेंडुलकरचा मेणाचा पुतळा मॅडम तुसाद न्‍यूयॉर्कच्‍या लॉबीमध्‍ये चाहत्‍यांसाठी फोटो काढण्‍याकरिता मोफत उपलब्‍ध असेल, ज्‍यानंतर त्याला म्‍युझियममधील इतर क्रीडा आयकॉन्‍सच्‍या मेणाच्‍या पुतळ्यांमध्‍ये कायमस्‍वरूपी स्‍थान देण्‍यात येईल.

टॅग्स :सचिन तेंडुलकरट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024ऑफ द फिल्ड