श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे ग्रह फिरले की काय, असा प्रश्न पडल्यास हरकत नाही. इंग्लंड दौऱ्यावर लंकन संघाला ट्वेंटी-20 व वन डे मालिकेत एकही विजय मिळवता आला नाही. भारताविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंनी करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिलाय.. त्यात श्रीलंका क्रिकेटचे माजी Performance Analyst सनथ जयसुंदरा (Sanath Jayasundara) याच्यावर क्रीडा मंत्र्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनामुळे सर्व प्रमुख खेळाडू विलगिकरणात, तरीही इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्ध उतरवला नवा तगडा संघ!
आयसीसीच्या (ICC) भ्रष्टाचारविरोधी संहितेचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. सनथने 2019 साली श्रीलंका ए दौऱ्यात निवड प्रभावित करण्यासाठी क्रीडा मंत्र्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता, याप्रकरणी सनथ दोषी आढळला. ''सनथला आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीने दोषी ठरवलं आहे. त्याच्यावर सात वर्षांची बंदी घातली गेली आहे. त्याला 11 मे 2019 पासून निलंबित करण्यात आलं होतं,''असे आयसीसीनं स्पष्ट केलं.