जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 74 लाख 59, 741 पोहोचली आहे. त्यापैकी 37 लाख 78,537 रुग्ण बरे झाले आहेत, तर 4 लाख 19,041 जणांना प्राण गमवावे लागले. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत सहाव्या स्थानावर आला आहे. भारतात 2 लाख 87,155 कोरोना रुग्ण आहेत, त्यापैकी 8107 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 40,979 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील लॉकडाऊन हळुहळू शिथिल केल्यानंतरही लोकांना परिस्थितीचं गांभीर्य अजूनही कळलेलं नाही. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे. त्यात सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात क्वारंटाईन सेंटरमधील लोकं चक्क क्रिकेट सामना खेळताना दिसत आहेत. 37 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाखहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे तर 500 हून जास्त लाईक्स आणि 483 हून अधिक रिट्वीट करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ...
IPL 2020 खेळवणारच, BCCIने कसली कंबर; सौरव गांगुलीनं राज्य संघटनांना पाठवले पत्र
भावा स्वतःच्या जीवावरच मी इतकी वर्ष खेळलो; रोहित शर्माच्या ट्विटला Yuvraj Singhचं उत्तर