कोल्हापूर : ‘क्रिकेटची भारतातील लोकप्रियता पाहता, क्रिकेटजगतात भारत पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे येत्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत,’ असे मत भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. दिव्यांगांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.वाडेकर म्हणाले, ‘भारतीय क्रिकेट संघ सर्वोत्तम बनला आहे. आयपीएलसारख्या स्पर्धा क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. नवीन खेळाडूंना या स्पर्धांतून संधी मिळते. मोठ्या खेळाडूंबरोबर खेळल्याने नवीन खेळाडूंना अनुभव मिळतो. भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना भारताने राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्रयस्त ठिकाणी खेळून पाकिस्तानला हरविले तर आनंद होतो; त्यामुळे परदेशात कुठेही भारत व पाकिस्तान यांच्यात सामने व्हावेत. या सामन्यांना आंतरराष्ट्रीय सर्वाधिक क्रिकेटप्रेमींची गर्दी होते व ते विविध वाहिन्यांवरही मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात.‘ खेळाडूंना अधिक आर्थिक लाभ होत असल्याने भविष्यात आणखी मोठ्या संख्येने मुले क्रिकेटकडे वळतील. ‘आयसीसी’चे तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमियायांच्या कार्यकाळामध्ये क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आला. पुढे शरद पवार यांच्या कार्यकाळामध्ये यात आणखी वाढ झाली. त्याचा खूप मोठा फायदा जुन्या व नव्या खेळाडूंना होऊ लागला,’ असेही वाडेकर या वेळी म्हणाले.दिग्गजांना नवोदितांची भीती‘आठ महिने सामने होत आहेत. यासाठी तंदुरुस्तीला अधिक प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आदी खेळाडू तंदुरुस्तीवर भर देत आहेत; कारण त्यांच्यापुढे नव्या खेळाडंूचे आव्हान आहे,’ असेही वाडेकर यांनी सांगितले.दिव्यांगांच्या स्पर्धेतून नवे खेळाडूदिव्यांगांच्या या स्पर्धेमधून अनेक नवीन खेळाडू घडत आहेत. भारताने बांगलादेश संघाला आमंत्रित केले आहे; तसेच इंग्लंडमध्ये भारतीय संघाला आमंत्रित करण्यात आले. २८ राज्यांत दिव्यांग सामने खेळले जातात. प्रत्येक झोनमध्ये ही स्पर्धा घेतली जाते. ४० %पेक्षा जास्त अपंगत्व आलेले खेळाडू या स्पर्धेत खेळतात.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने व्हावेत - अजित वाडेकर
भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने व्हावेत - अजित वाडेकर
‘क्रिकेटची भारतातील लोकप्रियता पाहता, क्रिकेटजगतात भारत पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे आहे. त्यामुळे येत्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 3:23 AM