India vs England, 1st Test Day 5 : भारतात येण्यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर आशिया खंडातील खेळपट्टीचा अभ्यास केलेल्या इंग्लंडच्या संघानं पहिली कसोटी सहज जिंकली. जेम्स अँडरसनच्या ( James Anderson) एका षटकानं टीम इंडियाला बॅकफूटवर पाठवले. दुसऱ्या स्पेलमध्ये जिमीनं शुबमन गिल, अजिंक्य रहाणे व रिषभ पंत यांना बाद करून टीम इंडियाचा कणाच मोडला. शुबमन गिल व विराट कोहली यांची अर्धशतकी खेळी वगळता भारतासाठी काहीच चांगलं झालं नाही. इंग्लंडच्या ४२० धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला १९२ धावा करता आल्या. इंग्लंडनं हा सामना २२७ धावांनी जिंकला. टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणं अवघड?; जाणून घ्या समीकरण
इंग्लंडच्या संघानं पहिल्या डावात ५७८ धावा चोपल्या. कर्णधार जो रुटनं द्विशतक झळकावलं, त्यानंतर भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर गडगडला. इंग्लंडनं दुसऱ्या डावात १७८ धावा करून भारतासमोर ४२० धावांचे लक्ष्य ठेवले. आर अश्विननं दुसऱ्या डावात इंग्लंडच्या सहा फलंदाजांना बाद केले. भारताला दुसऱ्या डावात १९२ धावाच करता आल्या. शुबमन गिल व विराट कोहली यांची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. जॅक लिचनं चार, जेम्स अँडरसननं तीन विकेट्स घेतल्या. या विजयासह इंग्लंड ४४२ गुणांसह व ७०.२ टक्क्यांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. टीम इंडियाची थेट चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. टीम इंडियाला धक्क्यांवर धक्के; २२ वर्षानंतर चेन्नईत पराभव अन् गमावले जागतिक कसोटीतील अव्वल स्थान!
१९९९नंतर चेन्नईत टीम इंडिया प्रथमच कसोटी सामना हरली. इंग्लंडनं टीम इंडियाची घरच्या मैदानावरील ८ सामन्यांची विजयी मालिका खंडीत केली. भारताची घरच्या मैदानावरील १४ सामन्यांची अपराजित मालिकाही आजच्या सामन्यामुळे खंडीत झाली. इंग्लंडचा हा भारतातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २००६मध्ये मुंबईत त्यांनी २१२ धावांनी विजय मिळवला होता. ही कसोटी पाहण्यासाठी चेन्नईतील एका नवरदेवानं हॉलमध्येच भारत-इंग्लंड सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था केली होती. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला आहे.