Join us  

क्रिकेट माझ्या रक्तातच, पुनरागमन कठीण नाही - विराट कोहली 

काही दिवसांसाठी मी क्रिकेटपासून दूर गेलो होतो तरी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी मला वेळ लागणार नाही असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 8:19 PM

Open in App

मुंबई -  काही दिवसांसाठी मी क्रिकेटपासून दूर गेलो होतो तरी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी मला वेळ लागणार नाही असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे. आज भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी आज मुंबईमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये तो बोलत होता.

यावेळी विराट म्हणाला,  भारतीय संघाचा 2017 मधला प्रवास पाहता तो उल्लेखनीय आहे, सातत्याने जिंकण्याची इच्छाशक्ती आणि विजयाची भूक ही आमच्यात कधीच कमी होणार नाही.  मागील अनेक दिवसांपासून आशियामध्येच क्रिकेट खेळणारा भारतीय संघ बऱ्याच महिन्यांनंतर वेगळ्या खेळपट्ट्यावर खेळणार असल्याने भारतीय संघावर चांगल्या कामगिरीचा दबाव असेल अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्याबद्दल प्रश्न विचारला असता विराटने आम्ही तिथे कोणाला काहीतरी सिद्ध करुन दाखवण्यासाठी जात नसल्याचे सांगितले. आम्ही तिथे क्रिकेट खेळण्यासाठी जात असून आमच्या देशासाठी आम्ही शंभर टक्के कामगिरी करु असा विश्वास विराटने व्यक्त केला.  परदेशात जिंकायचे असेल तर जास्त काळ क्रिकेट खेळणे गरजेचे आहे, आम्ही मागच्या वेळी जे नाही करू शकलो ते आता करायचे आहे असेही विराट म्हणाला.

भारताचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचे अनुष्का शर्मासोबत नुकतेच लग्न झाले. या लग्नासाठी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सामन्यात त्याने न खेळण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर दिल्ली आणि मुंबई येथे स्वागत समारंभ देखील आयोजित करण्यात आले ज्यात भारताचे आजी माजी क्रिकेटपटू त्यासोबतच चित्रपटसृष्टितील कलावंत उपस्थित होते.

विराटसेना 5 जानेवारी 2018 ते 24 फेब्रुवारी 2018 या दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 कसोटी सामने, 6 वन-डे सामने, आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआयद. आफ्रिका