काठमांडू : भारत आणि नेपाळ दरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी क्रिकेटचा वापर करण्यावर भर देण्याचे संकेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. इंडियन प्रीमिअर लीगच्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला.
नेपाळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या मोदी यांनी दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी खेळ महत्त्वाची भूमिका बजावतील, असे सांगितले. ते म्हणाले, ‘आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत. आयपीएलमध्ये नेपाळचा खेळाडू खेळत आहे.’ दिल्लीकडून संदीप लामिछाने हा नेपाळचा क्रिकेटपटू खेळत आहे. याचाच उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला. फिरकीपटू लामिछाने हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत चमकला होता. मोदी म्हणाले, ‘क्रिकेटच्या माध्यमातून लोकांमधील संबंध सुधारण्यास मदत होईल. त्याचबरोबर अन्य खेळांच्या माध्यमातूनही या दोन देशांदरम्यान चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात.’
Web Title: Cricket plays an important role in Nepal-India relations
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.