Join us  

आश्चर्य...! वनडे क्रिकेटमध्ये कधीच आउट झाले नाही हे 3 भारतीय फलंदाज, आता विस्मृतीत हरवले

भारताचे असे तीन फलंदाज आहेत, जे एकदिवसीय सामन्यात कधीच बाद झाले नाही. मात्र, आता विस्मृतीच्या अंधकारात हरवले आहेत आणि त्यांची कारकीर्दही संपली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 3:48 PM

Open in App

क्रिकेटच्या इतिहासात शतके झळकावणारे आणि धावांचा पाऊस पाडणारे अनेक महान फलंदाज होऊन गेले आहेत. मात्र, असेही काही नशीबवान फलंदाज आहेत, जे त्यांच्या एकदिवसीय कारकिर्दीत कधीही बाद झाले नाही. भारताचे असे तीन फलंदाज आहेत, जे एकदिवसीय सामन्यात कधीच बाद झाले नाही. मात्र, आता विस्मृतीच्या अंधकारात हरवले आहेत आणि त्यांची कारकीर्दही संपली आहे. तर जाणून घेऊयात या 3 भारतीय फलंदाजांसंदर्भात...

सौरभ तिवारी -सौरभ तिवारीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय ठेवला, तेव्हा त्याला धोनीचा डुप्लिकेट म्हटले जात होते. सौरभच्या लांब केसांमुळे लोक त्याची तुलना धोनीशी करत होते. सौरभने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून टीम इंडियामध्ये स्थान मिळवले होते. सौरभ तिवारीने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने टीम इंडियासाठी केवळ तीन एकदिवसीय सामने खेळले, यात त्याला केवळ दोन डावांतच फलंदाजी करता आली. या दोन्ही डावांत तो नाबाद राहिला. यानंतर, त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाबाद फलंदाज असतानाही सौरभची कारकीर्द संपुष्टात आली.

फैज फजल -फैज फजलला देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली होती. मात्र त्याला भारतासाठी केवळ एकच सामना खेळता आला. 2016 मध्ये झालेल्या या एकदिवसीय सामन्यात फैज फझलने झिम्बाब्वेविरुद्ध 55 धावांची नाबाद खेळी केली होती. या शानदार अर्धशतकानंतरही त्याला संघातून वगळण्यात आले. हा देखील एकदिवसीय क्रिकेटमधील नाबाद फलंदाज आहे.

भरत रेड्डी -आजच्या तरुण पिढीला भरत रेड्डी हे नाव कदाचितच माहीत असेल, पण या खेळाडूलाही भारताकडून केवळ तीन वनडे सामनेच खेळण्याची संधी मिळाली. भरत रेड्डी यांनी 1978 ते 1981 पर्यंत भारतासाठी केवळ तीन एकदिवसीय सामने खेळले. यांपैकी त्यांना केवळ दोन वेळाच फलंदाजीची संधी मिळाली आणि ते दोन्ही वेळा नाबाद राहिले. यानंतर भारत रेड्डी यांनाही संघातून बाहेर करण्यात आले आणि त्याच्या करिअरचाही दुःखद शेवट झाला.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ