दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( Pakistan Super League) खेळता येणार नाही. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं त्यांच्या खेळाडूंना PSL मध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र ( NOC) देण्यास नकार दिला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे ( CSA) संचालक ग्रॅमी स्मिथ ( Graeme Smith) यांनी हा निर्णय घेतला आहे. खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि स्थानिक स्पर्धांना प्राधान्य द्यावे यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.
''दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय व स्थानिक स्पर्धांचे वेळापत्रक लक्षात घेता खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यासाठी NOC दिली जाणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट व स्थानिक स्पर्धा यांना खेळाडूंनी प्राधान्य द्यायला हवं. न्यूझीलंड दौरा आणि बांगलादेशचा आफ्रिका दौऱ्यासाठी करारबद्ध खेळाडूंनी राष्ट्रीय कर्तव्यासाठी उपलब्ध असायला हवं. हाच नियम स्थानिक स्पर्धांसाठीही लागू होणार आहे, त्या स्पर्धाही लवकरच सुरू होतील,''असे स्मिथनं स्पष्ट केलं.
तो पुढे म्हणाला,''पण, भविष्यात जर आंतरराष्ट्रीय व स्थानिक स्पर्धा आणि PSL यांच्या वेळापत्रकात क्लॅश होत नसेल तर आम्ही खेळाडूंना नक्की NOC देऊ. याआधीही आम्ही तशी परवानगी दिली आहे.''CSA च्या या निर्णयाचा मर्चंट डी लँगे, इम्रान ताहीर आणि रिली रोसोवू यांना काही फार फरक पडणार नाही. त्यांना CSA नं करार दिलेला नाही. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू उपलब्ध नसल्यामुळे आता मोहम्मद हुरैरा ( इस्लामाबाद युनायटेड) व साहीबजादा फरहान ( कराची किंग्स) यांची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. मुल्तान सुल्ताननं डेव्हिड विली. जॉन्सन चार्ल्स आणि बेन डंक, तर क्युएत्ता ग्लॅडीएटर्सनं शिमरोन हेटमायर यांना करारबद्ध केले आहे.
PSL च्या संघातील रिप्लेमेंट खेळाडूंची नावं ( Replacement draft picks)
- इस्लामाबाद युनायटेड - मुसा खान, झहीर खान, मुहम्मद हुरैरा
- कराची किंग्स - साहीबजादा फरहान, जॉर्ड थॉम्पसन, मुहम्मद तहा
- लाहोर कलंदर्स - मुहम्मद इम्रान रंधावा, अकीब जावेद, बेन डंक
- मुल्तान सुल्तान - डेव्हिड विली, रिझवान हुसैन, जॉन्सन चार्ल्स, डॉमिनिक ड्रेक्स
- पेशावर जाल्मी - मोहम्मद उमेर
- क्युएत्ता ग्लॅडीएटर्स - घुलाम मुदस्सर, ल्यूक वूड, विल समीद, अली इम्रान, शिमरोन हेटमायर