Join us  

एबी डिव्हिलियर्सची फटकेबाजी पाहायला मिळणार; तीन संघांमध्ये अनोखा सामना रंगणार!

किंग फिशर्स, क्विंटी काईट्स आणि एबी ईगल्स असे या संघांची नावं असून कागिसो रबाडा, क्विंटन डी कॉक आणि एबी डिव्हिलियर्स हे या संघांचे नेतृत्व करणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 12:59 PM

Open in App
ठळक मुद्देतीन संघ एकाच दिवशी एकाच सामन्यात एकमेकांना भिडणारअनोख्या क्रिकेट सामन्यांचे नियमही आहेत भन्नाट

कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात इंडियन प्रीमिअर लीग आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवरही अनिश्चिततेचं सावट आहे. दोन-अडीच महिन्यांनी क्रिकेटला सुरुवात होणार आहे. इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. आता दक्षिण आफ्रिकेतही क्रिकेटला सुरुवात होणार आहे. पण, हा क्रिकेट सामना थोडा वेगळा असेल, इथे तीन संघांमध्ये एक सामना होणार आहे. या सामन्यात एबी डिव्हिलियर्स यांच्यासह आफ्रिकेचे दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर 27 जूनला हा सामना होणार होता, परंतु त्याची नवीन तारीख दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळानं बुधवारी जाहीर केली. 

TikTok स्टारला करायचेय लोकेश राहुलशी लग्न; तिचे फोटो पाहून व्हाल 'बोल्ड'!

किंग फिशर्स, क्विंटी काईट्स आणि एबी ईगल्स असे या संघांची नावं असून कागिसो रबाडा, क्विंटन डी कॉक आणि एबी डिव्हिलियर्स हे या संघांचे नेतृत्व करणार आहेत.  Solidarity Cup असे या मॅचला नाव देण्यात आले आहे. प्रत्येक संघात 8 खेळाडूंचा समावेश असेल आणि 36 षटकांच्या सामन्यात प्रत्येक संघाला 12 षटकं खेळण्याची संधी दिली जाणार आहे.  एक संघ उर्वरित दोन संघांविरुद्ध 6-6 षटकांच्या ब्रेकसह 12 षटके फलंदाजी करेल. संघातील सातवा गडी बाद झाल्यावर नाबाद फलंदाज फलंदाजी करू शकेल. पण, त्याची एकेरी धाव ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे त्याला केवळ दुहेरी धाव घ्यावी लागेल. प्रत्येक गोलंदाज जास्तीत जास्त तीन षटके टाकू शकतो. 12 षटकांत सर्वाधिक धावा करणारा संघ विजेता घोषित केला जाईल.

विजेत्या खेळाडूला सुवर्णपदक, उपविजेत्या संघाला रौप्यपदक तर तिसऱ्या क्रमांकावरील संघाला कांस्यपदक दिले जाईल. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावला जाईल. हा सामना 18 जुलैला होणार आहे. 

"तिथे मॅप बदलले जात आहेत, आपण इथे ॲप वर बंदी घालतोय, काय पोरकटपणा आहे!"

लोकेश राहुलसाठी पुन्हा एकदा 'कॉफी' डोकेदुखी ठरली; विराट कोहलीनंही फिरकी घेतली

कब्रस्तानमध्ये सराव करायचा टीम इंडियाचा 'हा' शिलेदार; सौरव गांगुलीनं बदललं आयुष्य!

 

टॅग्स :एबी डिव्हिलियर्सद. आफ्रिका