Cricket Sri Lanka Ban: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंका क्रिकेटला मोठा दिलासा दिला आहे. गेल्यावर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर आयसीसीनेश्रीलंका क्रिकेट बोर्डावर बंदी घातली होती. त्यामुळे अंडर-19 विश्वचषक 2024 चे यजमानपद श्रीलंकेच्या हातून गेले. पण, आता ICC ने श्रीलंकेवरील बंदी उठवली आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात खेळल्या गेलेल्या विश्वचषक 2023 मध्ये श्रीलंकन संघाने अतिशय खराब कामगिरी केली. त्यानंतर श्रीलंका सरकारच्या क्रीडा मंत्र्यांनी संपूर्ण बोर्डालाच निलंबित केले. या राजकीय हस्तक्षेपामुळे आयसीसीने क्रिकेट बोर्डावर बंदी घातली होती. आता तब्बल 3 महिन्यांनंतर आयसीसीने श्रीलंकेच्या बोर्डावरील ही बंदी उठवली आहे.
क्रीडा मंत्रालयाने बोर्ड बरखास्त केलाविश्वचषकात भारताकडून 302 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने संपूर्ण क्रिकेट बोर्ड बरखास्त केला होता. क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले होते की, 'देशाचा 1996 विश्वचषक विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा यांची नवीन अंतरिम मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.' रणसिंगे यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला देशद्रोही आणि भ्रष्ट म्हटले होते.
विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेची खराब कामगिरीश्रीलंकन संघाची विश्वचषकात कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. संघाला 9 पैकी फक्त 2 सामने जिंकता आले. संघाने फक्त इंग्लंड आणि नेदरलँड्सचा पराभव केला. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारख्या अन्य आशियाई संघांनेही श्रीलंकेचा पराभव केला होता.