इंग्लंडच्या संघाचा पराभव करत न्यूझीलंडन (England Vs New Zealand) आणि पाकिस्तानचा पराभव कर ऑस्ट्रेलियानं (Pakistan Vs Australis) टी २० विश्वचषक (T20 World Cup) सामन्याच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतु न्यूझीलंडला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवणारा न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशमनं सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला इशारा दिला आहे. "आपला संघ केवळ सेमीफायनल जिंकण्यासाठी अर्ध्या जगाची सफर करून आला नाही," असं वक्तव्य त्यानं यावेळी केलं. आपला संघ अंतिम सामन्यात नक्कीच विजय मिळवेल आणि त्यानंतर संघ याचा जल्लोषही साजरा करेल, असं तो म्हणाला. नीशमनं इंग्लडविरोधात झालेल्या सामन्यात ११ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या होत्या. तसंच न्यूझीलंडच्या संघानं पुरनगारमन करत इंग्लंडच्या संघाचा पाच विकेट्सनं पराभव केला होता.
न्यूझीलंडचा संघानं सेमीफायनलच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ जल्लोष साजरा करत होते. परंतु नीशम हा शांतपणे खुर्चीवर बसला होता. त्यानंतर त्यानं अजून कामगिरी फत्ते झाली नसल्याचं म्हटलं होतं. त्याचा तो फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.
ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेटनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर एफ व्हिडीओ शेअर केला आहे. "मला वाटतं ती जल्लोष साजरा करण्याचाी संधी होती. परंतु तुम्ही केवळ सेमीफायनलपर्यंत पोहोचण्यासाठी अर्ध्या जगाची सफर करत नाही. आता आमचं ध्येय अंतिम सामना आहे. मी व्यक्तिगत आणि एक टीम रूपात पुढील विचार करत नाही. परंतु फायनल सामना जिंकलो तर आम्ही मोठा जल्लोष साजरा करू," असं तो व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.
Web Title: cricket t20 world cup final nz vs aus jimmy neesham says you dont come halfway around the world just to win semifinal
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.