Join us  

भारतात जूनमध्ये खेळला जातोय पहिलाच कसोटी सामना!

भारतात जूनच्या महिन्यात खेळला जाणारा हा पहिलाच कसोटी सामना आहे हे बहुतेकांना माहित नसेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 11:55 AM

Open in App

-ललित झांबरे

क्रिकेट हा आता बारमाही खेळ झाला आहे. जवळपास दररोज कुठला न् कुठला सामना होतच असतो. आता बंगळुरूत सुरूअसलेल्या भारत आणि अफगणिस्तानदरम्यानच्या कसोटी सामन्याचेच उदाहरण घ्या ना! अफगणिस्तानचा हा पहिलाच कसोटी सामना आहे हे तर जगजाहीर आहे पण, भारतात जूनच्या महिन्यात खेळला जाणारा हा पहिलाच कसोटी सामना आहे हे बहुतेकांना माहित नसेल.

भारतात आतापर्यंत २६४ कसोटी  सामने खेळले गेले आहेत. हा सामना २६५ वा आणि भारतभूमीवर जूनमध्ये खेळला जाणारा पहिलाच!

जूनमध्ये क्रिकेटचा सिझन इंग्लंडमध्ये बहरात असतो परंतु आपल्याकडे पावसाचे दिवस असल्याने वादळवारे आणि पावसाचे दिवस लक्षात घेता आतापर्यंत जूनमध्ये कसोटी सामने टाळलेच जात होते परंतु, अलीकडे व्यावसायिक क्रिकेटचे कॕलेंडरच एवढे व्यस्त आहे की नव्या संघासोबत सामने खेळायचे तर अशा अॉफ सिझनमध्येच शक्य आहे म्हणून बहुधा हा सामना जूनमध्ये होत असावा.

मात्र अजूनही मे आणि जुलै हे दोन महिने असे आहेत की त्यात अद्यापतरी भारतात कसोटी क्रिकेट सामना खेळला गेलेला नाही. दरवर्षी होणाऱ्या आयपीएलमुळे मे महिन्यात कसोटी सामना होण्याची शक्यता कमीच आहे पण, जुलै हा भर पावसाळ्याचा महिना असला तरी त्यात भविष्यात कसोटी सामना खेळला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :क्रिकेटभारतअफगाणिस्तानइंग्लंड