'क्रिकेटचा वाघ' ताडोबाच्या जंगलात; सचिन तेंडुलकरने केली कोलरा गेटमधून सफारी

भारताचे माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर वाघ्र प्रेमापोटी ताडोबात आले आहेत. चिमूर तालुक्यातील कोलारा गेट येथून ताडोबातील वाघाच्या भेटीला शुक्रवारी दुपारी तीन वाजता गेले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:13 PM2020-01-24T18:13:14+5:302020-01-24T18:21:41+5:30

whatsapp join usJoin us
'Cricket Tiger' s Sachin Tendulkar in Tadoba forest for tiger safari | 'क्रिकेटचा वाघ' ताडोबाच्या जंगलात; सचिन तेंडुलकरने केली कोलरा गेटमधून सफारी

'क्रिकेटचा वाघ' ताडोबाच्या जंगलात; सचिन तेंडुलकरने केली कोलरा गेटमधून सफारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राजकुमार चुनारकर, चिमूर(चंद्रपूर) : आपल्या वेगवेगळ्या क्रिकेट खेळीने पूर्ण क्रिकेट जगताचा वाघ म्हणून ओळख निर्माण करणारे भारताचे माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर वाघ्र प्रेमापोटी ताडोबात आले आहेत. चिमूर तालुक्यातील कोलारा गेट येथून ताडोबातील वाघाच्या भेटीला शुक्रवारी दुपारी तीन वाजता गेले आहेत.




    सचिन तेंडुलकर जेव्हा-जेव्हा विदर्भात आले तेव्हा त्यांना वाघ्र दर्शनाचे मोह आवरता आला नाही. याही घडीला सचिन खासदार क्रीडा महोत्सवानिमित्त नागपुरात आले असता  शुक्रवारी दुपारी तीन वाजता वाघाच्या हमखास दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा वाघ्र प्रकल्पात चिमूर तालुक्यातील कोलरा गेट येथून ताडोबा जंगलात वाघाच्या दर्शनासाठी गेले.  यापूर्वीही तो नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात वाघ्र दर्शनासाठी गेला होता. यावेळी त्यांना वाघाचे दर्शनही झाले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील पर्यटक वाघांना बघण्यासाठी ताडोबात दाखल होत असतात. येथील वाघोबांनी मुंबापुरी येथील नट, नटीसह, क्रिकेट जगतातील ब्रायन लारा, अनिल कुंबळे सह अनेकांना भूरळ घातली आहे. त्यात आता क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकर याचाही समावेश आहे. तेंडुलकर वाघोबांचे दर्शन घेण्यासाठी ताडोबात दाखल झाला आहे. क्रिकेटच्या जगतात सचिन तेंडुलकरचे नाव आदराने घेतले जाते. तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रम आहेत. ताडोबातील वाघांनी तेंडुलकरला भूरळ घातली. त्यामुळेच येथील वाघोबांची झलक बघण्यासाठी तेंडुलकर ताडोबात दाखल झाले आहेत. यावेळी सचिन तेंडुलकर यांनी वन विभागाच्या अधिकार्यासह शासकिय वाहनातून ताडोबात प्रवेश केला त्यांच्या प्रवेशा बाबत प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली आहे. 

चाहत्यांचा झाला भ्रमनिरास
प्रशासनातर्फे सचिनच्या ताडोबा भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत असली तरी ज्या चाहत्यांना माहिती झाली त्यांनी कोलारा गेट येथे गर्दी केली. मात्र तीन वाजता सचिन बांबू गेस्ट हाऊस येथून वन विभागाच्या शासकीय गाडीने गेटवर न थांबता जंगलात सफारीला निघून गेले. त्यामुळे चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

Web Title: 'Cricket Tiger' s Sachin Tendulkar in Tadoba forest for tiger safari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.